स्वच्छता ही सेवा अभियान 2024 चे पंढरवाडा कार्यक्रमाचे समारोप.
सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक
गडचिरोली : दिनांक १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजित स्वच्छता पंधरवाडा या कार्यक्रमाचे उद्घाटन जन शिक्षण संस्थान, गडचिरोली चे संचालक मा. श्री. केशव आर. चव्हाण यांच्या मार्गदर्शना नुसार करण्यात आले होते.या अभियान मध्ये जिल्हाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जन शिक्षण संस्थान,गडचिरोली कौसल्य विकास व उद्योजगता मंत्रालय,भारत सरकार च्या माध्यमातून स्वच्छता ही सेवा अभियान 2024 चे 14 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या अभियान ची सुरुवात करण्यात आली होती. सदरील अभियान चे समारोप दिनांक 01ऑक्टोबर 2024 ला 'स्वच्छता ही सेवा' स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता अभियानाची सांगता करण्यात आली.
आज शिवणकला केंद्र डोंगरगाव येथे परिसर स्वच्छता करून रॅली काढण्यात आली यावेळी जन शिक्षण संस्थान गडचिरोली संचालक मा. केशव आर. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डोंगरगाव केंद्राच्या प्रशिक्षिका सौ. सुचिता ठाकरे, सौ. अनिता ठाकरे व प्रशिक्षनार्थी यांच्या माध्यमातून परिसर स्वच्छता करण्यात आले.
तसेच गडचिरोली येथे जन शिक्षण संस्थान, गडचिरोली व नगर परिषद गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यामाने " स्वच्छता ही सेवा ", स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी शासकीय विश्राम गृह ते जिल्हा परिषद रोड व कॉम्प्लेक्स परिसर स्वच्छ करून स्वच्छता मित्र यांना मा. श्री. केशव आर. चव्हाण जन शिक्षण संस्थान गडचिरोली संचालक यांनी मार्गदर्शन केले. स्वच्छता मित्र यांनी साफ सफाई करतांना हातात ग्लोज, तोंडाला मास्क व पायात बूट टाकून काम करावे, पाण्याच्या टाकीत न उतरता मशीनरी च्या माध्यमातून कामे करावी व जोखीम टाळावे. इत्यादीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाला स्वच्छता मित्र,तसेच शहर समन्वयक रेवननाथ गाढवे, स्वच्छता निरीक्षक गणेश बोरकर,स्वच्छता पर्यवेक्षक राम टेंभुर्णे,सुपरवायझर रमेश बारसागडे,प्रमोद भांडेकर मंगरू अटकेवार,समया जगन्नाथ, नीरज रामटेके,चोखा रायपुरे,जयदेव चिलबुले, भाऊराव उंदीरवाडे,अमित खोब्रागडे,स्वप्निल निमगडे, मारुती बोलीवार इत्यादी उपस्थित होते.