पोटच्या 2 चिमुकल्या लेकींना पुलावरून नदीत फेकले ; मुली बेपत्ता झाल्याचा बनाव.

पोटच्या 2 चिमुकल्या लेकींना पुलावरून नदीत फेकले ; मुली बेपत्ता झाल्याचा बनाव.


एस.के.24 तास


बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या पित्याने क्रूरतेचा कळस गाठला! पोटच्या दोन चिमुकल्या लेकींना पुलावरून नदीत फेकले.यामुळे दोन्ही निरागस बालिकांचा करुण अंत झाला.निष्ठुर पित्याच्या या टोकाच्या पावलाने बुलढाणा आणि अकोला जिल्ह्याचा सीमावर्ती परिसर हादरला आहे.


खामगाव (जिल्हा बुलढाणा) ते बाळापूर (जिल्हा अकोला दरम्यान) दरम्यान काल रात्री उशीरापर्यंत हा भीषण घटनाक्रम घडला.बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव ग्रामीण, हिवरखेड आणि अकोला जिल्ह्यातील बाळापूर पोलिसांनी खाकीतील " माणुसकी’ दर्शन घडविले "  पोलीस हद्ध चा बाऊ न करता तिघांनी बाळापूर ते अकोला दरम्यानच्या नदीत बालिकांचा अथक शोध घेतला. 


अखेर शनिवारी 5 ऑक्टोबरच्या रात्री दीड ते दोन वाजेदरम्यान दोन्ही बहिणींचे मृतदेह हाती लागले. प्रकरणी पित्यास खामगाव ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले असून, घरगुती वादातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक चौकशीत उघडकीस आले आहे.


बाळापूर ते अकोला दरम्यान ही जनमानस सुन्न करणारी भीषण घटना घडली आहे. मात्र आरोपी बुलढाणा जिल्ह्यातील जिल्ह्यातील लोणी कदमापूर या गावातील रहिवासी आहे.तसेच आपल्या मुलींची क्रूर हत्या करण्यासाठी त्यांनी अटाळी (तालुका खामगाव) मधून बाळापूर कडे नेले.यामुळे तपास खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.

मुली बेपत्ता झाल्याचा बनाव : -

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील लाखनवाडा नजिक असलेल्या लोणी कदमापूर येथील आरोपी पित्याचे नाव शेख हारून शेख शब्बीर असे आहे. निर्दयी बापानेच सात वर्षीय कुमारी सदफ व नऊ वर्षीय कुमारी आलिया या दोघा चिमुकल्या बहिणींना बाळापूर (जिल्हा अकोला) नजीकच्या नदीत फेकले. बाळापुर ते अकोला या राष्ट्रीय महामार्गावरील विटांच्या भट्ट्या असलेल्या परिसरात हे कृत्य केले.


त्यापूर्वीकदमापूर येथील शेख हारून शेख शब्बीर यांनी दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार शनिवारी (दिनांक 5) संध्याकाळी पोलिसात दिली होती. आपण दोन्ही मुलींना अटाळी येथून ऑटो रिक्षात बसवून दिले होते अशी बनवाबनवी करण्याचा त्याने प्रयत्न केला.चाणाक्ष पोलिसांना संशय आल्याने आणि त्याच्या बोलण्यात विसंगती असल्याने त्यांनी शेख हारून यावरच शंका आली. 


पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर खाक्या दाखवताच त्यानेच आपल्या कृत्याची कबुली दिली. आपल्या मुलींचे मृतदेह नदीत फेकल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने दिलेल्या माहितीवरून बाळापुर येथील ‘बायपास’वरील नदीमध्ये दोन्ही मुलींचा मृत्यू शोधण्यासाठी खामगाव ग्रामीण,हिवरखेड व अकोला पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !