मान्यवर कांशीराम साहेबांच्या 18 व्या परिनिर्वान दिनानिमित्य गांधी चौकात बहुजन समाज पार्टी विधानसभा क्षेञाच्या वतीने अभिवादन कार्यक्रम संपन्न.
एस.के.24 तास
गडचिरोली : बहुजन समाज पार्टी गडचिरोली विधानसभा क्षेञातर्फे मान्यवर कांशीराम साहेब बामसेफ,डि. एस. 4, बहुजन समाज पार्टी संस्थापक यांच्या 18 व्या परिनिर्वान दिनानिमित्य इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे अभिवादन सोहळा आयोजित करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 09.00 वाजता मा.भास्कर मेश्नाम जिल्हा प्रभारी गडचिरोली, मायाताई मोहुर्ले महिला जिल्हाध्यक्ष बसपा गडचिरोली यांच्या हस्ते मान्यवर कांशीराम साहेब यांच्या फोटोला मार्लापर्ण करुन मोमबत्ती प्रज्वलित करुन कार्येक्रमाची सुरुवात करण्यात आले. यावेळी नरेश महाडोळे अध्यक्ष भाईचारा कमेटी गड., अनिल साखरे कोषाध्यक्ष बसपा गड, मंदीप गोरडवार अध्यक्ष विधानसभा गडचिरोली, ज्ञानेश्वर वाळके उपस्थित होते.
दिवस भरानंतर सायंकाळी 06.30 वाजता मान्यवर का़शीराम साहेबांच्या 18 व्या परिनिर्वाण दिनानिमित्य अभिवादन कार्यक्रमास सुरुवात झाली.प्रमुख पाहुन्याचे स्थानग्रहन, स्वागत, व मान्यवर कांशीराम साहेबांच्या फोटो समोर मोमबत्ती पेटवुन व फुल चळवुन प्रमुख अतिथीनी अभिवादन केले.
सुमन क-हाडे व वेणुताई खोब्रागडे यांनी स्वागत गित गायन करुन पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मनोगत घेण्यात आले. यावेळी कार्येक्रमाचे अध्यक्ष मा. भास्कर भाऊ मेश्नाम जिल्हा प्रभारी बसपा, यांनी मान्यवर कांशीराम साहेबांनी दलित शोषित बहुजन समाजाला सामाजिक चळवळीशी जोडुन डाँ. बाबासाहेब आंबेडकर या़च्या शासनकर्ती जमात कशी तयार होईल. त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.
प्रमुख अतिथी मा. रमेश मडावी माजी प्रदेश सचिव बसपा यांनी मान्यवर कांशीराम साहेब या़च्या दिनाबाना एका सामान्य व्यक्तिच्या जिवनसंघर्षामधुन कांशीराम साहेब महापुरुषात परिवर्तन कसा झाला. असा प्रकारे साहेबांच्या जिवन संघर्षावर आपले मनोगत व्यक्त केले.
नंतर मा.एम.डी.चलाख सामाजिक कार्येकर्ते,यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त केले.मायाताई मोहुर्ले महिला जिल्हाध्यक्ष बसपा, यांनी कांशीराम साहेब यांचे कार्योचे महत्व पटवुन दिले. तसेच मा. हेमंत रामटेके सर,वेणुताई खोब्रागडे शहर अध्यक्षा, जांबुडकर ताई
भावनाताई खोब्रागडे, लताताई येरमे यांनी मान्यवर का़शीराम साहेब यांच्या विषयी आपल्या मनोगटातुन इतर महत्व पटवुन दिले. यावेळी मा. नरेश महाडोळे भाईचारा कमेटी, मा. कैलास खोब्रागडे सर, मा. केशव भालेराव सर,मा. क-हाडे सर, मा. शाम रामटेके सर, गोवर्धन साहेब, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्तो उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मा. मंदीप गोरडवार विधानसभा अध्यक्ष बसपा तर आभार प्रदर्षण मा. दुधे साहेब यांनी केले.