12 हत्तीचा कळप वाकडी फाट्याजवळून गेला शिवणी मार्गे : सतर्कता बाळगण्याचा नागरिकांना इशारा.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : गडचिरोली वरून अवघ्या 5 कि.मी अंतरावरील वाकडी च्या जंगलातून एकंदरीत 12 हत्तीला कळप शिवणी मार्गे गेला असुन शिवणी,मारकबोडी वासीयांना सर्तक राहण्याचा ईशारा दिलेला आहे.
आज दि.6 ऑक्टोबर 2024 सकाळी 6:00 वाजता च्या दरम्यान सुमारे 12 हत्तीचा कळप वाकडी जंगलातून वाकडी फाट्याच्या समोर चामोर्शी रोड शिवणी कडे प्रयाण करीत असतांना प्रत्यक्षदर्शी बामसेफ चे जिल्हाध्यक्ष,भोजराज कानेकर,डोमा गेडाम,प्रेमदास रामटेके,प्रमोद राऊत उंदिरवाडे सर्व राहणार गोकुळनगर हे सकाळी 5:00 वाजता मार्निग वॉक ला जात असतांना त्यांनी १२ हत्तीचा कळप कॅमेरात टिपला.
मागील पाच दिवसापूर्वी हाच हत्तीचा कळप वाकडी वरून मुडझा - फुलक ल मार्ग वैनगंगा नदिकिणारी फॉक्टरी जंगलात आजुबाजुला मुक्कामाने होता.सदर कळप पुन्हा वाकडी हिरापुर- मारकबोडी जंगलात रात्रौ मुक्कामाला होता तो आज पहाटे 6 वाजता पुन्हा चामोर्शी रोडने सरळ शिवणीकडे निघाला.
हत्तीचे कळप बघताच काही फोरव्हिलरवाले थांबले होते. तर आता १२ हत्तीचा कळप शिवणी जवळपास किंवा मारकबोडी जंगलात जात आहे सदर परिसरातील नागरिकांनी सर्तक राहण्याचा ईशारा रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी दिलेला असून गडचिरोली वनविभागाचे कर्मचारी मात्र झोपले आहेत.