मॅजिक बस NHKP टीमच्या वतीने मकेपल्ली येथे शैक्षणिक जागृती कार्यक्रम संपन्न.
एस.के.24 तास
चामोर्शी : दिनांक 12/09/2024 ला चामोर्शी तालुक्यातील मकेपल्ली येथे *शैक्षणिक जागृती कार्यक्रम* घेन्यात आला त्या मध्ये पालकांचा मोठया प्रमाणात सहभाग होता. वेगवेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेत मकेपल्ली गावातील महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, स्पर्धेच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व, आरोग्य, पोषण,उच्च शक्षणाचे महत्व, खेळाद्वारे विकास, इत्यादी विषयांचां समावेश होता, या कार्यक्रमाला ला गावातील जेष्ठ नागरिक तसेच गावकऱ्यांनी कार्यक्रमाला चांगली उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाला समजून घेतले.स्पर्धेत विजयी झालेल्या पालकांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
मॅजिक बसचे वरिष्ठ जिल्हाकार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे सर, तालुका प्रमुख दिनेश कामतवार सर, योगिता सातपुते मॅडम, त्यामध्ये माझे सहकारी युवा मार्गदर्शक सोनाली रणदिवे, पंकज शंभरकर, यांच्या अथक परिश्रमाने हे कार्यक्रम पार पडले.