जर्नी फ्रॉम एन.एच.क्लासरूम ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT)' या विषयावर थेट संवाद.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : विद्यार्थ्यांच्या मनातील न्यूनगंड दुर करण्याच्या हेतुने ने.हि.महाविद्यालय,ब्रम्हपुरी येथे एका भारतीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये पी.एच.डी.पुर्ण करुन " टाटा इंडस्ट्रीज' या नामांकित संस्थेमध्ये शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत डॉ. रश्मी चंद्रभान शेंडे यांच्याशी विद्यार्थ्यांनी थेट संवाद साधला. रश्मीने तीचे महाविद्यालयीन शिक्षण ने.हि. महाविद्यालय,ब्रम्हपुरी येथे पुर्ण करुन आय.आय.टी. गाठली.
तिथे पी.एच.डी.मिळवुन ग्राफिन बिझनेस, टाटा स्टील प्रा.लिमिटेड, जमशेदपूर येथे शास्त्रज्ञ या पदावर सध्या कार्यरत आहेत. तीने तीच्या या संपुर्ण प्रवासात आलेल्या खडतर अडचणी आणि त्यावर तिने यशस्वीपणे केलेली मात यांचा उलगडा विद्यार्थ्यांसमोर करुन विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणाची विविध दालने खुली करुन दिली. या " रिकनेक्ट " उपक्रमाचे आयोजक प्रा.दलेश परशुरामकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाची यशोगाथा अधोरेखित केली.समन्वयक डॉ.अतुल येरपुडे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष योगदान दिले. विभागप्रमुख डॉ. रतन मेश्राम यांनी या उपक्रमात सहभागी सर्वांचे आभार मानले.