जन शिक्षण संस्थान,गडचिरोली यांची प्रथम (BOM) बैठक संपन्न.
सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक !
गडचिरोली : दिनांक 23/09/2024 ला " जन शिक्षण संस्थान,गडचिरोली " कौसल्य विकास व उद्योजगता मंत्रालय, भारत सरकार यांची प्रथम (BOM) व्यवस्थापन मंडळ बैठक मा.श्री.विजय बहेकार साहेब चेयरमन ( अध्यक्ष) जन शिक्षण संस्थान गडचिरोली यांच्या अध्यक्षटतेखाली पार पडली.
यावेळी मा.श्री.दौलतराव शिवणकर सचिव जन शिक्षण संस्थान गडचिरोली उपस्थित होते. तसेच यावेळी मा.श्री.योगेंद्र शांताराम शेंडे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौसल्य व रोजगार कार्यालय, गडचिरोली, मा.श्री.गीता शिवणकर मॅडम सदस्यां,मा.श्री.स्वप्नील पिंपळे सर जिल्हा कौसल्य अधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली. मा. कुरसाम मॅडम जिल्हा उद्योग केंद्र चे कर्मचारी,सौ.वानिता रतन बांबाळे कौसल्य विकास विभाग महिला प्रतिनिधी, मा.सुरेखा केशवराव बारसागडे,मा.श्री.बावणकर सर, शासकीय ITI प्रतिनिधी गडचिरोली
मा.मनिषा सजनपवार,इंडस्ट्रीज महिला,मा.मनोज मधुकर सजनपवार इंडस्ट्रीज पुरुष पदाधिकारी मा.योगेंद्र सर शिक्षण अधिकारी प्राथमिक, गडचिरोली,मा.राजेंद्र श्रीधर डोंगरे,ST, SC प्रवर्ग,बँक ऑफ इंडिया चे व्यवस्थापक, मा.नूतन बंडू ताकसांडे प्राचार्य,CBSC,कारमेल,मा.श्री. केशव आर.चव्हाण संचालक व सदस्य सचिव कौशल विकास मंत्रालय, भारत सरकार तथा जन शिक्षण संस्थान गडचिरोली उपस्थित होते.
बैठकीत मान्यवारांचे स्वागत करण्यात आले,मा.श्री. विजय बहेकार चेयरमन यांचे स्वागत मा.श्री.केशव आर. चव्हाण संचालक जन शिक्षण संस्थान,गडचिरोली यांनी केले. मा. श्री. दौलतराव शिवणकर सचिव यांचे स्वागत मा.श्री.गजानन अलोणे कार्यक्रम अधिकारी यांनी केले.
मा.श्री.विजय बहेकार साहेब चेरमन तथा संस्थापक अध्यक्ष यांनी मा.श्री.योगेंद्र शेंडे साहेब सहाय्यक आयुक्त जिल्हा कौसल्य रोजगार कार्यालय, गडचिरोली यांचे स्वागत केले. बैठकीत PM विश्वकर्मा योजना, PMKVY योजना, बाल विकास मंत्रालय पायलेट, प्रकल्प व जन शिक्षण संस्थान मार्फत चालणाऱ्या विविध प्रशिक्षण कोर्स बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मा. श्री.केशव आर.चव्हाण संचालक यांनी मान्यवारांचे आभार मानले.