आझाद युवा गणेश मंडळ मुरसा तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन.

आझाद युवा गणेश मंडळ मुरसा तर्फे विविध स्पर्धेचे आयोजन.


एस.के.24 तास


भद्रावती : आझाद युवा गणेश मंडळ मुरसा च्या वतीने नवीन पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात आला.या गणेश उत्सवाचा उद्देश गावाचा विकास करायचा असेल तर तरुणांनी एकत्र येवून समाज जागृती करण्याचे काम करून आजच्या पिढीमध्ये  सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी.

या उद्देशाने आझाद युवा गणेश मंडळ मुरसा च्या वतीने गावातील मुलांच्या कौशल्याला वाव मिळावा महिलांना चूल व मूल यापूर्तेच मर्यादित न राहता आपल्या मधे असलेल्या कौशल्याचा विकास करून स्व बळावर पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन व संपूर्ण गाव एकत्रित येवून सामाजिक व विकासात्मक दृष्टीकोन ठेऊन काम करावे व समाज सोबतच विकास अश्या विविध हेतूने मंडळातर्फे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.


यामध्ये 8/9/2024 ते 14/9/2024 या कालावधीत रोज नवीन नवीन सर्धांचे आयोजन करण्यात आले त्यामधे चमचा चोरी, पोटाटो रेस,वॉटर रिले, शूट द कोण, संस्कृतिक कार्यक्रम अश्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सोबतच विजेते चमुंना गावातील तसेच बाहेर गावातील प्रतिष्ठित नागरिकानि विशेष आकर्षक भेट वस्तू बक्षीस म्हणून देण्यात आले व विजेत्यांचे प्रोत्साहन वाढविले.


या कार्यक्रमाला संपूर्ण गावकरी यांनी मदत केली.गणेश विसर्जनाची   विशेष बाब म्हणजे आजच्या तरुण पिढीच्या मनात सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी व एक आदर्श गाव या युवकांच्या माध्यमातून निर्माण व्हावा या साठी गणेश मूर्तीचे विसर्जन कोणत्या DJ च्या किंवा बँड च्या गजरात नव्हे तर निसर्गाची जोपासना करत पारंपरिक पद्धतीने भजन व शाळकरी मुलांच्या लेझिमच्या गजरात तसेच गावातील लहान बाळ गोपालांच्या हाती सामाजिक संदेश देणारे चित्रीकरण व  समजिक सुविचार देऊन गणेश मूर्ती ची मिरवणूक मोठ्या दिमाखात गावातील युवक युवती सोबतच संपूर्ण मुरसा गाववाशी एकत्र येऊन पाडण्यात आले.


यात संपूर्ण मुर्सा ग्रामवाशि भजनाच्या नादात तल्लीन होऊन रॅलीमध्ये सहभागी झाले व गणेश विसर्जनाचा आनंद घेतला व एक बाळ गंगाधर टिळक यांनी ज्या बंधीकीने गणेश उत्सवाची सुरवात केली त्याचे फलित मुरसा वासीयांनी प्रत्येक्षात आपल्या मुरसा गावात करून दाखविले. या गणेशोत्सवाची वाहवाही सर्वोत्र होत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !