ओबीसीची जातनिहाय जनगणना म्हणजे ओ.बी.सी.च्या उत्कर्षाचा एक्स - रे : डॉ.संजय घाटे,अध्यक्ष भारतीय ओबीसी महापरिषद तथा बहुजन समता पर्व चंद्रपूर

ओबीसीची जातनिहाय जनगणना म्हणजे ओ.बी.सी.च्या उत्कर्षाचा एक्स - रे : डॉ.संजय घाटे,अध्यक्ष भारतीय ओबीसी महापरिषद तथा बहुजन समता पर्व चंद्रपूर


राजेंद्र वाढई : उपसंपादक


चंद्रपूर : चंद्रपूर : ०७ सप्टेंबर २०२४ चंद्रपूर येथे आयोजित राष्ट्रीय ओबीसी महापरिषदेच्या निमित्ताने ओबीसी बांधवांमध्ये प्रचार आणि प्रचार करण्यासाठी बहुजन समता पर्व व भारतीय ओबीसी परिषदेचे अध्यक्ष डॉ.संजय घाटे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात जाऊन ओबीसी बांधवांचा न्याय हक्कासाठी आवाज बुलंद करीत आहेत.ओबीसी बांधवांना आपल्या न्याय हक्कासाठी सिध्द करण्यासाठी डॉ.संजय घाटे अहोरात्र मेहनत करीत आहेत.


ओबीसी जातिनिहाय जनगणनेला विरोध करणे म्हणजे ओबीसींच्या संपूर्ण विकासाचाच मार्ग बंद करणे होय.ओबीसी जातीनिहाय जनगणना हा ओबीसींच्या उत्कर्षाचा एक्स-रे आहे असे डॉ.संजय घाटे ओबीसी बांधवांचे प्रबोधन करतांना दिसून येत आहेत. 


आयोजित राष्ट्रीय ओबीसी महापरिषदेच्या निमित्ताने मार्गदर्शन करतांना डॉ.संजय घाटे म्हणतात की,जे आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आमचा वाटा देत नाहीत, त्यांना सत्तेत राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही.लोकसंख्येच्या प्रमाणात सत्तेत आणि प्रशासनात ओबीसींना वाटा मिळविण्यासाठी ओबीसींनी एकतेची वज्रमुठ बांधली पाहिजे त्यासाठीच राष्ट्रीय ओबीसी महापरिषदेचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रचार आणि प्रसार करतांना डॉ.संजय घाटे म्हणतात.


ओबीसींच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती मध्ये घट केली.वेळेत शिष्यवृत्ती मिळत नाही. शिक्षणावरचा खर्च कमी केला जातो आहे.एकीकडे शाळेत शिक्षक नाहीत तर दुसरीकडे शाळा बंद केल्या जात आहेत.ओबीसींच्या विकासासाठी आवश्यक तेवढ्या निधीची तरतूद नाही.लोकसंख्येच्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला तरच ओबीसींचा विकास होईल असेही डॉ.संजय घाटे प्रचार आणि प्रसारादरम्यान मार्गदर्शन करून ओबीसी बांधवांना आपल्या न्याय हक्कासाठी एकजूट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.


ओबीसी समाजाचा वाटा आधीच कमी असतांना त्यात आणखी वाटेकरी टाकण्याचा सरकारचा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी  आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम आर्य वैश्य समाजाला ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे ओबीसी बांधवांनी कुंभकर्णीय झोपेतून जागे होणे गरजेचे आहे अन्यथा आपल्या पिढ्या अंधाराच्या खाईत खितपत राहतील.


कोणतीही परिक्षा न घेता Lattor entry च्या मार्फत केंद्रीय सचिव पदावर नियुक्ती केली जाते.त्यामध्ये एकही ओबीसी युवक नसतो.ओबीसी युवकांमध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढते आहे.ओबीसी बांधवांनी एकीची माध्यमातून राष्ट्रीय ओबीसी महापरिषदेला मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ.संजय घाटे प्रत्येक गावा गावात करीत आहेत.त्यांच्या  आवाहनाला मोठ्या प्रमाणावर उत्फुर्त प्रतिसाद मिळतांना दिसतो आहे.


आपण सारे ओबीसी एक होऊ या !! 
ओबीसी विरोधी भूमिका घेणाऱ्यांना धडा शिकवू या !!


असे ओबीसी बांधवांकडून बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात बोलले जात आहे. 


ओबीसी बांधवांकडून डॉ.संजय घाटे यांना ओबीसींची बाजू विधानसभेत मांडण्यासाठी आगामी विधानसभेत बल्लारपूर मतदार संघात उभे राहण्यासाठी मोठ्या उत्फुर्तपणे जनतेकडून आग्रह धरला जातो आहे.डॉ.संजय घाटे जर  बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून उभे राहत असतील तर जनतेने डॉ.संजय घाटे यांना विधानसभेत पाठविण्याचे मनात ठायी ठायी ठरविल्याचे दिसून येते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !