आदिवासींच्या विविध समस्यावर सभेचे आयोजन 8 सप्टेंबर ला सेलिब्रेशन हाल आरमोरी येथे होणार.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : आदिवासींच्या विविध ज्वलंत समस्यांवर सामुहिक चिंतन व उपाय योजना वर चर्चा व चिंतन सिलेब्रेशन हॉल,आरमोरी येथे दि.8 सप्टेंबर २०२४ ला सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे . यात १२५०० पदभरती तात्काळ करावी पेसा अर्तगत नोकरी भरती करावी.
आदिवासी जमातीत बोगस आदिवासी नोकरी करीत आहेत त्यांना सेवेतून बडतर्फे करावे Sc / SC च्याअबकड वर्गवारी बद्दलचा निर्णय व निकाल तात्काळ रद्द करावा.संसदेने पारित केलेला नविन वन कायदा तात्काळ रद्द करावा. शिक्षण संस्था खाजगी ठेकेदारास देऊ नये.
सेवानिवृत्ती धारकांना पुन्हा नोकरीवर न घेता त्या जागेवर बेरोजगारांना उमेदवारांची नियुक्ती करावी आदि आदिवासी बांधवाच्या विविध समस्याचे निराकरण करण्याकरीता आदिवासी बांधवानी बहुसंखेंनी उपस्थित राहण्याचे आवाहन गोटुल समिती आरमोरी चे प्रमुख प्रा.दौलत धुर्वे संयोजन क्रांती केरावी,गोंगपाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत मडावी , बिरसा ब्रिगेडचे गणेशदा वरखडे प्रा.रमेश कोरचा आदिनी आलेले आहे.
सदर सभेला आदिवासी बांधवाच्या विविध सामाजीक संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा आयोजकांनी केलेले आहे.