ग्रामीण रुग्णालय सावली येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप.
★ नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे व नगरसेविका सौ.राधाताई ताटकोंडावार यांचा वाढदिवस साजरा.
सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक
सावली : दिनांक,२६ सप्टेंबर २०२४ नगरपंचायत कार्यालय सावलीचे नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे व नगरसेविका सौ.राधाताई ताटकोंडावार यांनी आपल्या वाढविसानिमित्य मानवतेचे दर्शन दिले आहे, राज्याचे विरोधी पक्षनेते,आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी जपलेले जनसेवा हिच ईश्वर सेवा यांचे व्रत जोपासले आहे त्यांचे आदर्श घेत नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे व नगरसेविका सौ.राधाताई ताटकोंडावार यांनी वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालय सावली येथील रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप केले.
तसेच नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे व नगरसेविका सौ.राधाताई ताटकोंडावार यांचा वाढदिवस जनसंपर्क कार्यालय सावली येथे साजरा करण्यात आला.याप्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,शहराध्यक्ष व नगरसेवक मा.विजय मुत्यालवार
माजी सभापती पंचायत समिती सावली मा.विजय कोरेवार, युवा शहर अध्यक्ष मा.अमर कोणपत्तीवार,नगरसेवक मा.प्रफुल वाळके, मा.अंतबोध बोरकर,मा.अनिल गुरुनले, मा.राजू बुरीवार,मा.आशिष मुत्यालवार,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.अमन खोब्रागडे,मा.कुणाल मालवणकर आदि उपस्थित होते.