अंगणवाडी मध्ये बुरशी,जाळे लागलेला आहार पुरवठा ; बालकांच्या जीवाशी खेळ.

अंगणवाडी मध्ये बुरशी,जाळे लागलेला आहार पुरवठा ; बालकांच्या जीवाशी खेळ.


एस.के.24 तास


भंडारा : एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्पाअंतर्गत अभ्यंकर नगर,हनुमान नगर यासह इतर भागात येत असलेल्या मुक्ताबाई अंगणवाडी केंद्रात महिला बचत गटाच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा रोजी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. 


हा बालकांच्या जीवाशी खेळ असल्याचा माहिती ,अंगणवाडी सेविका,बबिता सारंगपुरे यांनी स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख,अमित एच मेश्राम यांना दिली.


मुक्ताबाई अंगणवाडीत पाठविलेल्या बालकांना उत्तम आहार मिळत नसल्याने अंगणवाडी सेविकांनी याबाबत नगरपरिषदेच्या सहाय्यक प्रकल्प अधिकारी यमुना नागदेवे आणि बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार पवनीकर यांच्याकडे अनेकदा तक्रार केल्यानंतरही संबंधित अधिकारी याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचे सांगण्यात आले.


अंगणवाडी सेविकेने शिवसेनेकडे केलेल्या तक्रारींची दखल घेऊन गुरुवारी सकाळी मुक्ताबाई अंगणवाडीमध्ये जाऊन चौकशी केली. यावेळी मुक्ताबाई अंगणवाडी केंद्र क्रमांक ९३, ९४, ९५ (४११) यामध्ये बालकांना निकृष्ट दर्जाचे आहार देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. तसेच रोजी महिला बचत गटाच्या माध्यमातून बालकांना ताजा पोषण आहार व्यवस्थितरित्या करून देण्यात येत नसून त्या आहारात अळ्या व सोंडे दिसून येतात. 


याबाबत अंगणवाडी सेविकाकडून अनेकदा तक्रार करूनही संबंधित अधिकारी याकडे डोळेझाक करीत असून येथे साधी पाहिनी सुध्दा केली जात नाही. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका व पालकवर्गामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.


भंडारा जिल्ह्याचे बालविकास प्रकल्प अधिकारी तुषार पवनीकर,सहाय्यक रचना घरवार यांच्यासह संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना याप्रकरणी शिवसेनेने निवेदनाद्वारे माहिती दिली. सदर रोजी महिला बचत गटाच्या माध्यमातून शिळे,बुरशी, जाळे असलेल्या अन्न बालकांना देण्यात येत आहे. यामुळेच मुक्ताबाई अंगणवाडीमध्ये बालकांच्या प्रकृती बिघडत असल्याची माहिती दिली आहे. 


शिवसेनेने गुरुवारी सकाळी मुक्ताबाई अंगणवाडीला भेट देऊन पाहणी केली. लहान मुलांच्या जीवाशी खेळ करून निकृष्ठ आहार पुरवठा करणाऱ्या संबंधित बचत गटावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे विभाग प्रमुख,अमित एच मेश्राम, अंगणवाडी सेविका बबिता सारंगपुरे यासह काही पालक वर्ग उपस्थित होते.


परवाना रद्द करू - पवनीकर

याबाबत विचारणा करण्यासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी तुषार पवनीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अंगणवाडी सेविका किंवा शिवसेना पक्ष अशी कुणाकडूनही आजवर माझ्याकडे तक्रार आलेली नव्हती. ज्या महिला बचत गटाच्या मार्फत या अंगणवाडी केंद्राला आहार पुरवठा होतो त्यांना या आधीही तंबी देण्यात आली आहे.पुन्हा एका आठवड्याची मुदत देण्यात येत आहे. यापुढे असा प्रकार झाल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल.


निकृष्ट दर्जाचा पुरवठा - शिवसेना

प्रशासना मार्फत बालकांना पोषक आहार मिळावा, यासाठी अंगणवाडीमध्ये बचत गटाच्या माध्यमातून आहार पुरविला जातो. मात्र काही ठिकाणी बालकांना पौष्टिक आहार दिला जात नसून निकृष्ठ दर्जाचा आहार पुरवठा केला जातो. अशा तक्रारी अलीकडे वाढू लागल्या आहेत. शिवसेना असला प्रकार खपवून घेणार नाही. यावर संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी अंगणवाडीत जाऊन तपासणी करणे गरजेचे आहे, असे शिवसेना विभाग प्रमुख अमित एच मेश्राम यांनी सांगितले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !