शहरातील पथदिवे बंद असल्याने वार्डवासीय अंधारात. - नगरपंचायतचे दुर्लक्ष ; जनता त्रस्त


शहरातील पथदिवे बंद असल्याने वॉर्डात अंधारमय ; नगरपंचायत चे दुर्लक्ष,जनता त्रस्त.


राहुल सोमनकार !! तालुका प्रतिनिधी,पोंभूर्णा !!


पोंभूर्णा : शहरातील श्री.राजराजेश्वर मंदिर परिसरातील पथदीवे गेल्या महिनाभरापासून बंद आहेत.मात्र अजुन पर्यंत नगरपंचायत कडून पथदीवे लावण्याचे काम केल्या गेले नाही.त्यामुळे वार्डवासियाकडून नगरपंचायतच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात येत आहे.


तर या घटनेबद्दल नगरपंचायतचे विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांनी परिसरातील पथदिवे तात्काळ लावण्यात यावे अन्यथा नगरपंचायतवर तेलाचे दिवे लावणार असल्याचा इशारा यावेळी दिलेला आहे.


शहरातील प्रभाग क्र.१२ मधील श्री राजराजेश्वर मंदिर परिसरातील पथदीवे गेल्या महिनाभरापासून बंद आहेत.आठवडी बाजार रस्त्यावरचे व फिल्टर प्लॅंट परिसरातील पथदिवे बंदच आहे.एवढेच नव्हे तर त्याच मार्गावर असलेल्या मुख्याधिकारी यांचा निवासाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पथदिव्यांची सुद्धा बत्ती गुल झाली आहे.मात्र यावर नगरपंचायतने अजुनपर्यंत तोडगा काढलेला नाही.


वार्डवासियांनी पथदिवे बंद असल्याची तक्रार केली होती मात्र यावर नगरपंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी दुर्लक्षच केले.सद्या पावसाचे दिवस आहेत पोंभूर्णा शहरातील बहुतांश नागरिक हे शेतकरी,शेतमजूर आहेत त्यांना रस्त्यावर चालताना साफ,विंचूची भिती सतावत आहे.मुख्याधिकारी यांचे याच परिसरात निवासस्थान आहे.


त्यांनाही आपल्या निवासाकडे येता जाताना अंधाराचा सामना करावा लागत आहे.खुद्द मुख्याधिकारी यांच्या परिसरात अशी अवस्था आहे तर शहरातील बाकी वार्डाची काय परिस्थिती असेल याची चर्चा  शहरवासी करीत आहेत.


वार्ड वासियांनी अनेकदा पथदिवे बंद असल्याची तक्रार दिली.मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले नाही.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ श्री.राजराजेश्वर मंदिर परिसरातील पथदीवे सुरू करण्यात यावे अन्यथा आम्ही नगरपंचायतवर तेलाचे दिवे लावू. - आशिष कावटवार,विरोधी पक्षनेते न.पं.पोंंभूर्णा 

 

 पथदिवे दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.दोन दिवसात प्रभाग क्रमांक १२ मधील पथदीवे सुरू होतील. - आदित्य खापणे,विद्युत अभियंता न.पं.पोंभूर्णा

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !