बसपाचा कार्यकर्ता मेळावा उद्या गडचिरोलीत.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - बहुजन समाज पार्टी जिल्हा गडचिरोली बसपा पार्टी कार्यकर्ता मेळावा व पक्ष प्रवेश कार्यक्रम दि. ०१ ऑक्टोंबर २०२४ दुपारी १२ वाजता शिवाजी महाराज भवन , महिला महाविद्यालय चंद्रपूर रोड , गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.
मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन बसपाचे माजी खासदार डॉ. अशोक शिद्धार्थ बसपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲड. सुनिल डोंगरे आदि लाभणार आहेत. तर प्रमुख अतिथी म्हणुन बसपाचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष शंकर बोरकुट ,बसपाचे जिल्हा प्रभारी भाष्कर मेश्राम , प्रदिप खोब्रागडे , गणपत तावाडे , बसपा महिला आघाडी प्रमुख मायाताई मोहुर्ले , बसपा कोषाध्यक्ष प्रदिप साखरे आदि लाभणार आहेत. सदर कार्यक्रमात संविधान बचाव रॉली
पक्ष प्रवेश , बसपा जिल्हा कार्यालयाचे उदघाटन तसेच मार्गदर्शन लाभणार असुन विधानसभा निवडणुकीत बसपा ताकतिने मैदानात कशी उतरणार यावरही विचार मंथन होणार आहे. तरी सदर कार्यक्रमास हजारोंच्या संख्येनी उपस्थित राहण्याचे आवाहन , बसपाचे रमेश मडावी , वामन राऊत मंदिप गोरडवार , नरेश महाडोरे , मालता पुडो , ताजमुल हुसेन , मुकेश खोब्रागडे , सुधिर वालदे , लिंगायत , भालेराव सर, कविता वैघ , आशिष घुटके , दुषांत चांदेकर , दर्शना शेंन्डे , प्रिती मडावी आदिनी केलेले आहे.