गडचिरोली ची सेलिब्रिटी ऑरगानायकर,ज्योती उंदिरवाडे मराठी चित्रपटात चमकणार.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
गडचिरोली : गडचिरोली शहरात राहणारी मॉडलिंग गर्ल म्हणुन प्रसिद्ध असलेली ज्योती उंदिरवाडे यांची ' घमंड ' या मराठी चित्रपटासाठी तिची सिनेअभिनेत्री म्हणुन निवड झाली असुन सदर चित्रपट लवकरच रिलिज होत असुन ज्योती आता रुपेरी पडद्यावर लवकरच चमकणार आहे.
कथा,संवाद व दिग्दर्शक,दिपक म्हस्के सर यांचा घमंड ह्या चित्रपटाचे शुटींग सुरु असुन त्यांनी ज्योती उंदिरवाडे हिला सदर चित्रपटात अभिनेत्री म्हणुन निवड केली असुन चित्रपटात ज्योती हिला उद्योगपतीच्या पत्नी च्या भुमीकेत साकारणार आहेत.
यात जुने आणि नविन कलाकारांना घेऊन उडाणटपू मुले शिक्षणाकडे लक्ष न देणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून चांगली शिकवण " शिक्षण " संस्कार,घडविण्याचे कार्य घमंड या चित्रपटात म्हस्के सर चित्रपट तयार करीत असून त्यांनी गडचिरोली येथील ज्योती उंदिरवाडे हिच्या मधे असलेले कलागुण ओळखून त्यांनी ज्योतीची निवड केलेली आहे.
सदर चित्रपटाची शुटींग बांद्रा कुर्ला मुंबई,औरंगाबाद व विदेशातही होणार असुन चित्रपट निर्माते दिपक म्हस्के सर प्रेक्षकांच्या भेटीस घमंड चित्रपट लवकरच आनणार आहेत. ज्योती उंदिरवाडे आयोजीत फॅशन शो १५ सप्टेंबर २०२४ ला संस्कृती लॉन गडचिरोली प्रशिद्ध चित्रपट सेलिब्रिटी सारा खान ह्या विशेष उपस्थिती राहणार आहेत.