ब्रम्हपुरी रेल्वे स्टेशन वर तत्काल तिकीट देण्याची व्यवस्था सुरू करण्याची मागणी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२०/०९/२४ ब्रम्हपुरी येथील रेल्वे स्टेशन मध्ये तत्काल तिकीट काढण्याची सुविधा नसल्याने येथील प्रवाशांना नगाभिड किंवा देसाईगंज वडसा येथे जावे लागत असल्याने कमालीचा त्रास सहन करावा लागत होता.परंतु आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.दि.१७ सप्टेंबर रोजी खासदार डॉ नामदेवराव किरसान यांची भेट घेऊन ब्रम्हपुरी रेल्वे स्टेशन वर तत्काल रिझर्व्हेशन ची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे केली.
निवेदनातून पुढे म्हटले आहे की,मागील अनेक वर्षांपासून येथे फक्त जनरल रेल्वे तिकीट काढण्याची सुविधा होती.ब्रम्हपुरी तालुक्यातील व ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी मुले आणि मुली, पालकांना वेळोवेळी भोपाळ, जबलपूर,रायपुर,पुणे,मुंबई, नाशिक शहर व दिल्ली अन्य मोठमोठ्या शहरात मेडिकल व अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी तसेच नोकरी करण्यासाठी , देव दर्शनासाठी व इतर काही महत्त्वाच्या कामासाठी नागपूर,गोंदिया व चंद्रपूर या रेल्वे स्टेशन वरून रेल्वे पकडून पुढील प्रवास करताना नागरिक व विद्यार्थ्यांना अतोनात हाल कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
परंतु सामान्य जनतेला कोणत्या कामासाठी तत्काळ मध्ये रेल्वे ची तिकीट काढण्याची व बुक करायची असेल तर ब्रम्हपुरी वासियांना १६ किमी वडसा देसाईगंज व २० किमी अंतरावर असलेल्या नागभिड येथे जावे लागत असल्याने तसेच रिझर्व्हेशन ची वेळ ही सकाळी दहा वाजल्यापासून असल्याने व तत्काळ रिझर्व्हेशन करणाऱ्यांची संख्याही अधिक असल्याने गरजूंना तिकीट खिडकीवर क्रमांक लवकर लागावा व रिझर्व्हेशन कन्फर्म तिकीट लवकर मिळावे.
यासाठी सकाळी सहा ते सात वाजताच ब्रम्हपुरी येथून जाऊन हजर व्हावे लागते यासाठी सर्वांना त्रास सहन करावा लागत असल्याने हा त्रास दूर करण्यासाठी आवश्यक ते बदल करण्यासमंधाने निवेदन खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांना यावेळी करण्यात आली.निवेदन देते वेळी ब्रम्हपुरी येथील नागरिकांचे वतीने न.प.चे माजी नगर सेवक प्रितीस गजाननराव बुरले,निनाद गडे ,मनीष अलोने व इतर उपस्तीत होते.