ढीवर,भोई समाज आमदार,डॉ.देवरावजी होळी यांच्या पाठीशी. - डॉ.दिलीप शिवरकर
★ चामोर्शी येथे ढीवर,भोई व केवट समाज मेळावा संपन्न ; मेळाव्याला समाज बांधवांचा उदंड प्रतिसाद.
मुनिश्वर बोरकर : कार्यकारी संपादक
चामोर्शी : दिनांक १४ सप्टेंबर 2024 गडचिरोली आमदार डॉक्टर देवरावजी होळी विकासाचे पुरस्कर्ते आहेत .यांनी आपल्या समाजासाठी केलेली विकास कामे खरोखरच अभिनंदनीय असून आपला ढीवर,भोई,केवट समाज आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे प्रतिपादन सकल धीवर समाज सेवा समिती चंद्रपूरचे अध्यक्ष डॉक्टर दिलीप शिवरकर यांनी चामोर्शी येथे ढीवर ,भोई व केवट समाजाच्या मेळाव्या प्रसंगी केले.
चामोर्शी येथील तेली समाज सभागृहामध्ये ढीवर,भोई व केवट समाज बांधव व आमदार डॉक्टर देवरावजी होळी मित्रपरिवाराच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला आमदार डॉक्टर देवराव जी होळी यांनी मार्गदर्शन केले. मेळाव्याला उपस्थित होऊन आपल्यावर प्रेम व्यक्त केल्याबद्दल समाज बांधवांचे आभार मानले.
यावेळी मंचावर धीवर, भोई समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकरजी गद्दे ,सुधाकर गद्दे, शामराव राऊत, सुरेश गद्दे, संजय शिंदे, संगीता भोयर, देविदास भोयर, ठुमदेव सरपे, विलास गोहणे, देवराव वाघाडे, गुरूदास गेडाम, दिवाकर भोयर, संगीता गेडाम, ज्ञानेश्वर भोयर, मुकरू राऊत, सकल धीवर समाज सेवा समितीचे संचालक विजयजी नाने, जय वाल्मिकी समाज गनपूरचे शामराव राऊत , यांचे सह मान्यवर मंचावर उपस्थित होते.