अभय त्र्यंबक क-हाडे यांचे आकस्मिक निधन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : अ-हेरनवरगांव दिनांक,०८/०९/२४ विकास विद्यालय,अ-हेरनवरगाव येथे १/२/१९९६ पासुन शिपाई पदावर कार्यरत असलेले गावचे रहिवासी श्री अभय त्र्यंबक क-हाडे यांचे काल दि.०७/०९/२४ रोजी अकस्मात निधन झाले.मृत्यू समयी त्याचे वय,५० वर्षे होते.
साधी भोळी राहणीमान असलेले सगळ्यांशी मनमिळाऊपणे हसत बोलणारे अभय क-हाडे यांच्या पश्चात पत्नी,चार मुली आणि बराच मोठा क-हाडे सावकार आप्त परिवार आहे.
त्यांच्या आकस्मिक निधनाने अ-हेरनवरगाव वाशीय जनता हळहळ व्यक्त करीत असुन त्यांच्यावर अ-हेरनवरगाव येथील वैनगंगा मुर्दाघाटावर अंतिम संस्कार करण्यात आले तेव्हा प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.
उपस्थित जनसमुदायाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.