गुणवंत विद्यार्थी महाविद्यालयाचे भूषण. - मा.अशोक भैया
★ ने.हि.महाविद्यालयाचे १८ विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठाचे मेरिट.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२६/०९/२४ "आजचे युग हे स्पर्धेचे आहे.विद्यार्थ्यांनी अभ्यास करून आपले स्थान बळकट करणे महत्त्वाचे असून आपल्या १८ विद्यार्थ्यांनी या वर्षाला गोंडवाना विद्यापीठाचे गुणवत्ता यादीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे,याचा आम्हाला आनंद आहे.प्राध्यापकांनी मेहनत घेतली ते अभिनंदनास पात्र आहेत. महाविद्यालयासाठी असे गुणवंत विद्यार्थी भूषण ठरतात." असे बहूमूल्य विवेचन नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव मा.अशोक भैयांनी व्यक्त केले.ते गुणवंतांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डी एच गहाणे तर उपस्थितीत उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, डॉ रेखा मेश्राम, डॉ राजेंद्र डांगे उपस्थित होते.सत्र २०२३-२४ गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली गुणवत्ता यादीत महाविद्यालयाचे १८ विद्यार्थी मेरिट आलेत त्यांचा सत्कार सोहळा नुकताच महाविद्यालयात पार पडला.
यात एम. ए.( मराठी )ची स्वाती दा.धनविजय,एम.ए.(इतिहास)लिमंत्रिका भा.नवघडे,बी.लिप ची अंकिता सु.मदनकर, उत्कर्षा सु.कामडी(बी.ए.इतिहास प्रथम व बी.ए.द्वितिय मेरिट) हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत सर्वप्रथम येऊन सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. याशिवाय अंजली बोरकर ( एम.ए.इंग्रजी ,पाचवी मेरिट),श्रध्दा डोईजड ( एम.ए.मराठी तृतीय मेरिट)
दिशा सेलोकर व श्रीकांत पिसे (एम ए.भूगोल द्वितीय, तृतीय मेरिट),पंकछ श्रीभैये(एम.ए.इतिहास चवथे मेरिट),झरिन अन्सारी ( बी. काॅम दहावी मेरिट),आशिष दडमल ( एम काॅम सातवी मेरिट),भाविका सहारे ( एम एस्सी बाॅटनी तृतीय मेरिट),निकिता पिलारे (बि लिप द्वितिय मेरिट), शरदकुमार डोंगरवार (बि.लिप.तृतिय मेरिट),स्वाती ठेंगरी ( एम लिप.तृतिय मेरिट)व शेजल जिरीतखान ( बी.एसस्सी.सहावे मेरिट)हे विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
कार्यक्रमाचे संचालन डॉ.राजेंद्र डांगे तर आभार डॉ भास्कर लेनगुरेनी केले.या सत्कार सोहळ्याप्रसंगी समस्त प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.