जन शिक्षण संस्थान,गडचिरोली यांचा तिसरा " वर्धापन दिन " साजरा.
सुरेश कन्नमवार ! मुख्य संपादक
गडचिरोली : दिनांक 23/09/2024 ला " जन शिक्षण संस्थान,गडचिरोली " कौसल्य विकास व उद्योजगता मंत्रालय, भारत सरकार यांचा तृतीय वर्धापन दिन मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आला.
सदरील कार्यक्रमाचे उदघाटन मा.गीता शिवणकर मॅडम यांच्या हस्ते कारण्यात आले.सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.विजय बहेकार साहेब चेयरमन जन शिक्षण संस्थान,गडचिरोली सह उदघाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.मा.श्री.दौलतराव शिवणकर सचिव जन शिक्षण संस्थान गडचिरोली हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच यावेळी मा.सुरेखा केशवराव बारसागडे,मा,मनिषा सजनपवार,BOM सदस्या उपस्थित होते.
मा.श्री.केशव आर.चव्हाण संचालक,जन शिक्षण संस्थान, गडचिरोली हे उपस्थित होते.तसेच कार्यक्रम अधिकारी गजानन अलोणे,जय शिवहरे लेखापाल,अभिजित कृष्णापूरकर,नितेश चौधरी, यामिनी मातेरे प्रशिक्षक तसेच मोठ्या संखेने प्रशिक्षनार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी व वीर राजे चिमना बहाद्दूर यांच्या प्रतिमेला हार अर्पण व दीप प्रज्वल करून उदघाटन करण्यात आले.
तसेच प्रमुख पाहुण्यांचे शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.मा.श्री. विजय बाहेकर साहेव चेयरमन जन शिक्षण संस्था,गडचिरोली यांचे स्वागत मा. श्री. केशव आर. चव्हाण यांनी केले. तसेच मा.श्री. दौलतराव शिवणकर साहेब सचिव जन शिक्षण संस्थान, गडचिरोली यांचे स्वागत मा.श्री.गजानन अलोणे कार्यक्रम अधिकारी यांनी केले.
मा.गीता शिवणकर मॅडम सदस्या यांचे स्वागत यामिनी मातेरे यांनी केले.प्रास्ताविक मा.श्री.केशव आर.चव्हाण संचालक यांनी केले.मा.श्री.विजय बहेकार साहेबांनी प्रशिक्षकांना व पदाधिकारी व कर्मचारी यांना जन शिक्षण संस्थान च्या कामाबद्दल मार्गदर्शन केले.विध्यार्थ्यानी 100 % उपस्थित राहून प्रशिक्षण पूर्ण करावे व प्रशिक्षण केंद्रा च्या अन्य ठिकाणी सराव दररोज किमान दोन तास करावे जेणेकरून तरबेज झाल्यामुळे नोकरीची संधी उपलब्ध होईल.
याबाबत सखोल मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन यामिनी मातेरे यांनी केले. आभार प्रदर्शन गजानन अलोणे कार्यक्रम अधिकारी यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशश्वितेकरिता पदाधिकारी,अधिकारी, कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले.