मध्यरात्री झोपलेल्या माय - लेकींना विषारी सापाने सर्पदंशाने मायलेकींचा मृत्यू.
एस.के.24 तास
गोंदिया : देवरी तालुक्यातील येळमागोदी गावात मध्यरात्री झोपलेल्या मायलेकींना विषारी सापाने दंश केला. त्यांना चिचगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे चिचगड परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.कमळाबाई सुखीराम उसेंडी वय,30 वर्ष रा.येळमागोदी,मंजु सुखीराम उसेंडी वय,6 वर्ष रा.येळमागोदी असे मृत मायलेकींची नावे आहेत.रविवारी मध्यरात्री नंतर ही घटना घडली.