चंद्रपूर मध्ये पी.एफ.चे लाखो रुपये स्वतःच्या खात्यात वळवले ; तीन लेखापाल चा प्रताप.

चंद्रपूर मध्ये पी.एफ.चे लाखो रुपये स्वतःच्या खात्यात वळवले ; तीन लेखापाल चा प्रताप.


एस.के.24 तास


चंद्रपूर : कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे लाखो रुपये स्वतःच्या खात्यात वळविणाऱ्या तीन लेखापाल व कार्यक्रम सहायक, अशा राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत कार्यरत चार कर्मचाऱ्यांची सेवा तातडीने समाप्त करण्याची कारवाई करण्यात आली. या चौघांनी संगतनमताने हा अपहार केल्याचे चौकशीअंती स्पष्ट झाले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानंतर्गत कार्यरत लेखापाल नामदेव येनुरकर, लेखापाल (अंकेक्षण) प्रवीण सातभाई, लेखापाल राकेश नाकाडे आणि कार्यक्रम सहाय्यक प्रकाश मोहुर्ले अशी बडतर्फ कर्मचाऱ्यांची नावे आहे.

कंत्राटी कामगारांनी खाते तपासले अन्…

या अभियानांतर्गत जिल्ह्यात शेकडोच्या संख्येत कंत्राटी कामगार काम करीत आहेत. त्यांचा भविष्य निर्वाह निधी जमा करण्याची जबाबदारी या कर्मचाऱ्यांकडे होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी नियमित जमा केला.त्यानंतर घोळ करणे सुरू केले. या सर्वांनी ठरवून भविष्य निर्वाह निधीची रक्कम स्वतःच्या खात्यात वळती केली. या प्रकारला सन २०२१-२२ मध्येच सुरुवात झाली. 


तब्बल दोन वर्षे हा प्रकार सुरू होता. काही कामगारांनी ही रक्कम काढण्यासाठी खाते तपासणी केली. त्यावेळी त्यांना धक्काच बसला. त्यांच्या सेवेचा कार्यकाळ आणि जमा झालेला भविष्य निर्वाह निधी याचा ताळमेळ कुठेच जुळत नव्हता. त्यानंतर त्यांनी यासंदर्भात वरिष्ठांकडे तक्रारी दाखल केल्या.


पोलिसांत तक्रार नाही : - 


सप्टेंबर २०२४ ला जिल्हा परिषदेच्या लेखा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. उपरोक्त चारही जणांनी त्यांच्या खात्यात लाखो रुपये वळते केल्याचे स्पष्ट झाले. ही रक्कम या चारही जणांकडून वसूल करण्यात आली. त्यामुळे प्रकरण पोलिसांत गेले नाही. 


परंतु,यांची सेवा समाप्त करण्यात आली. रविवार, ८ सप्टेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे यांनी यासंदर्भात एक आदेश जारी केला. हे चारही कर्मचारी कंत्राटी तत्वावर येथे काम करीत होते. मात्र, एवढा मोठा घोळ होत असतानाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या लक्षात हा प्रकार आला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


किती रुपयांचा अपहार ?


बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचा कार्यभार त्याच विभागातील इतर कर्मचाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी आता पोलीस तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या घोटाळ्यात एकूण किती रक्कमेचा अपहार करण्यात आला, याबाबत आरोग्य विभाग चौकशी करीत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !