पोंभुर्णा महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी,वैशाली बुरांडे तर शहर अध्यक्षपदी,प्रियाताई पातळे यांची नियुक्ती.

पोंभुर्णा महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी,वैशाली बुरांडे तर शहर अध्यक्षपदी,प्रियाताई पातळे यांची नियुक्ती.


राहुल सोमनकार : तालुका प्रतिनिधी


पोंभुर्णा : चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नम्रता ठेंमस्कर यांनी नुकतीच पोंभुर्णा महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षपदी डोंगरहळदी तुकुम येथील ओबीसी (तेली) समाजाच्या पदवीधर होतकरू असलेल्या चेक हत्ती बोडी ग्रामपंचायत सदस्य व तिरुपती महिला बचत गटाच्या अध्यक्षा चेक हत्ती बोडी व सदस्या जिल्हा तेली समाज संघटना यांची निवड करण्यात आली असून तसे पत्र जिल्हाध्यक्षा नम्रता ठेमस्कर यांनी दिले आहे.                                              


तसेच पोभूर्णा शहर अध्यक्षा पदावर पदवीधर व ओबीसी संवर्गातील कुंभार समजात सक्रिय असलेल्या आणि नेहमी सामाजिक चळवळीत सहभाग घेणाऱ्या व गोरोबा महिला बचत गटाच्या अध्यक्षा असलेल्या आणि महिला काँग्रेसच्या पदावर कार्य करणाऱ्या प्रियाताई महेश पातळे यांची शहर अध्यक्षपदावर नियुक्ती केली असून  त्यांनाही जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे.


दोन्ही पदाधिकाऱ्यांचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे,काँग्रेस नेते सी डी सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत, जिल्हा महिला कांग्रेस अध्यक्षा नम्रता ठेमस्कर,तालुका अध्यक्ष वासुदेव पाल,ओमेशवर् पदमगिरवार व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !