उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक रेबिज दिन उत्साहात साजरा.

उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक रेबिज दिन उत्साहात साजरा.


एस.के.24 तास


वरोरा : दिनांक,२८ सप्टेंबर २०२४ ला उपजिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक रेबीज दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये रेबिज आजाराविषयी जनजागृती प्रचार व प्रसार करण्यात आला.



मंचावर डॉ.प्रफ्फूल खूजे वैद्यकीय अधीक्षक,डॉ प्रविण केशवानी दंत चिकित्सक,डॉ स्नेहाली शिंदे नेत्र शल्यचिकित्सक,डॉ.झाकिया यूनानी तज्ञ,वंदना विनोद बरडे अधीसेवीका उपस्थित होते सर्व अधिकारी यांनी रेबीज आजाराविषयी जनजागृती प्रचार व प्रसार करण्यासाठी आवाहन केले व मार्गदर्शन केले.घरगुती आजकाल सर्वच कुत्रे पाळतात.


तर त्यांचें बरोबर वेळोवेळी लसीकरण करायला पाहिजे.तसेच न पाळलेले कुत्रे असतात त्यांचे पण लसीकरण करायला पाहिजे.पण कोण करणार हा प्रश्न असतो आणि इथे खरी गल्लत होते आणि असे कुत्रे चावण्याचे प्रमाण जास्त असते.ज्या पाळीव प्राण्यांचे लसीकरण झाले तो प्राणी चावला तर तेवढं घाबरण्याचे कारण नसते पण जे कूत्रे रस्त्यावर असतात त्यांचे कुठलेही लसीकरण झालेले नसते.यापासून खूप सावध राहण्याची गरज आहे आणि पुर्ण औषधौपचार घेण्याची गरज आहे.


तसे तर कुठल्याही कूत्रा राहो किंवा प्राणी राहो तो पाळीव असो किंवा रस्त्यावरचा संपूर्ण औषधौपचार घेणे गरजेचे आहे.आणि जरूरीचे आहे.यामध्ये कूठलीही हयगय होता कामा नये नाहीतर जिवावर बेतू शकते म्हणून आपल्याला सावध व सतर्क राहणे जरुरीचे आहे.कार्यक्रमासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !