घराच्या मालकी हक्काचे घरपट्टे मिळालेच पाहिजे. - प्रिया खाडे अध्यक्ष,महिला आरपीआय.
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
कोरपना : कोरपणा तालुका अर्तगत जेवरा ग्रामपंचायत ताबाळी फाटा येथे अनेक वर्षापासून पक्की घरे बांधुन वासत्व करीत असणाऱ्या नागरिकास त्यांच्या घराचे मालकी हक्कपट्टे मिळावेत या मागणीसाठी प्रिया खाडे ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. (आंबेडकर) चंद्रपूर जिल्हा यांच्या नेतृत्वात कोरपना तालुक्याच्या वतीने.6.9.2024.शुक्रवार रोजी. जनसामाने आक्रोश मोर्चा कोरपणा रेस्ट हाऊस ते कोरपणा तहसील कार्यालय येथे भव्य मोर्चा काढण्यात आला.
१ कोरपना तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.प्रियाताई खाडे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तथा विदर्भ अध्यक्ष महिला यांच्या नेतृत्वात हजारो पुरुष व महिला भव्यदिव्य मोर्चा काढण्यात आला यात
प्रमुख मागण्या कोरपना तालुक्या अंतर्गत जेवरा ग्रामपंचायत.तांबाळी फाटा. येथे ८० घरांना आपल्या मालकी हक्काचे घरपट्टी मिळाले पाहिजे.
तसेच गडचांदूर शहर येथील बंगाली कॅम्प.येथील 150. घरांना वीजपुरवठा मिळाला पाहिजे.व तालुक्या पातळीवरील सर्व विद्यार्थ्यांना. पूर्ण कागदपत्र मिळाले पाहिजे इत्यादी मागण्या घेऊन मोर्चा काढण्यात आला व कोरपना तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले .
यावेळेस मोर्चात चंद्रपूर जिल्हाध्यक्ष,प्रियाताई खाडे. निशाताई धोंगले,समाजसेविका,गटचांदुर शहराध्यक्ष राजूभाऊ नडे. कोरपणा तालुकाध्यक्ष विकास कांबळे . निर्मला निमसटकर.आळकु कुळसंगे. सुरेश आश्रम. पंजाबराव नमोनवार. शोभा ठाकूर. सुरेश आत्राम. पुष्पाबाई सिडाम आदि सहीत बहुसंख्य नागरिक मोर्चात सहभागी झाले होते.