राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित. ■ अध्यक्ष पदी,विजय बोडै,सचिव पदी,अमोल आसेकर.

राज्य पत्रकार संघाची कोरपना तालुका कार्यकारिणी घोषित.


■ अध्यक्ष पदी,विजय बोडै,सचिव पदी,अमोल आसेकर.


एस.के.24 तास


कोरपणा : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ विभागीय अध्यक्ष प्रा.महेश पानसे यांचे सुचनेनुसार  संघाची तालुका कार्यकारिणी नुकतीच घोषीत करण्यात आली. 


जुनी कार्यकारिणी बरखास्त करून कार्यकारिणी सदस्य,यांचे उपस्थितीत काही नवीन पत्रकार सदस्यांना सभासदत्व बहाल करुन कार्यकारिणीची सर्वानुमते घोषणा करण्यात आली आहे.

        नवनिर्वाचित कार्यकारिणी अध्यक्षपदी विजयराव बोडै,उपाध्यक्ष पदी,मोहब्बत खान, सचिवपदी अमोल आसेकर,प्रसिद्धी प्रमुख पदी,जयंत जेणेकर,सहसचिव पदी,दिनेश झाडे,संघटक पदी,मंगेश तिखट, कोषाध्यक्ष पदी,प्रमोद गिरडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. 


संघाचे कोरपना शाखा सल्लागार म्हणून श्रीनिवास मुसळे व पवन मोहीतकर यांना सन्मान देण्यात आला आहे अशी माहिती सदस्य मनोज गोरे,कवडू गाताडे यांनी कळविले आहे.

              

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असून जनहितार्थ उपक्रम राबवून काम करणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष विजय बोडै व सचिव अमोल आसेकर यांनी स्पष्ट केले आहे.

              

विदर्भ विभागीय अध्यक्ष,प्रा.महेश पानसे, विदर्भ उपाध्यक्ष अमितकुमार भार्गव,उपाध्यक्ष प्रदीप रामटेके,विभागीय सरचिटणीस,शरद नागदेवे,चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष,जितेंद्र चोरडिया,कार्याध्यक्ष,शंकर बोरघरे,उपाध्यक्ष प्रा.धनराज खानोरकर,जिल्हा कार्यकारिणी सदस्य अनंत डोंगे,मनिष रक्षमवार,रुपचंद धारणे, बाळूभाऊ भोयर व सर्व तालुकाध्यक्ष यांनी नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !