नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे मोखाळा येथे आर्थिक मदत ; कॅन्सरग्रस्त व दुर्दर आजाराने ग्रस्त रुग्णास पुढील उपचारासाठी मदत.

नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे मोखाळा येथे आर्थिक मदत ; कॅन्सरग्रस्त व दुर्दर आजाराने ग्रस्त रुग्णास पुढील उपचारासाठी मदत.


एस.के.24 तास


सावली : दिनांक,२५ सप्टेंबर २०२४ सावली तालुक्यातील मौजा.मोखाळा येथे दुर्दर आजाराने ग्रस्त युवतीस व कॅन्सरग्रस्त रुग्णाचा कुटुंबियाना विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे मोखाळा येथील सरपंच सौ.प्रणिताताई म्हशाखेत्री व ग्राम काँग्रेस अध्यक्ष मा.अनिल पाटील म्हशाखेत्रि यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.



मौजा.मोखाळा येथील युवति मयुरी मानतेश रायपूरे वय २४ ह्या शिक्षण घेत असून वारंवार तबेत खराब होत असल्याने उपचार घेत आहेत परंतु तबेतीत काहीच फरक पडत नाही आहे, वडील मानतेश रायपूरे हे भूमिहीन शेतमजूर आहेत, घरातील आर्थिक स्थिती नाजूक असून मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत परंतु मयुरीची तबेत खराब असल्याने ते उपचार घेत आहेत.


तसेच मनोहर मारोती गोरडवार वय,४५ वर्षे हे भूमिहीन शेतकरी असून वारंवार तबेत खराब होत असल्याने उपचार घेत होते परंतु प्रकृतीत काही सुधारणा न झाल्याने पुढील उपचार घेत असताना डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले त्यांचे  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल नागपूर येथे उपचार चालू आहेत त्यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष,नितीन गोहने यांना मिळाली.आज रायपूरे व गोरडवार  कुटुंबियांना प्रत्यक्ष भेट दिली व राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आर्थिक मदत मिळवून दिली.


आर्थिक मदत देताना तालुका अध्यक्ष मा.नितीन गोहने, ग्रामपंचायत सदस्या जयश्री फाले,ग्रामपंचायत सदस्य विलास रोहणकर तसेच नितीन बोबाटे,राकेश बांबोळे,महेश रायपूरे आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !