गृहप्रवेश कार्यक्रमानिमीत्त लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत ; सावली पंचायत समितीचा उपक्रम.

गृहप्रवेश कार्यक्रमानिमीत्त लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरीत ; सावली पंचायत समितीचा उपक्रम.


एस.के.24 तास


सावली : सावली पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा -१ अंतर्गत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षामध्ये घरकुल बांधकाम पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत गृहप्रवेश कार्यक्रमा निमित्य प्रातिनिधीक स्वरुपात चाबी व प्रमाणपत्र वितरित करुन गृहप्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. 


सदर कार्यक्रम सावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर वासनिक व ग्रामिन गृहनिर्माण् कक्षातील बंडु मुरकुटे, विजय बोधे, गौरव सोरते, अजय लांडगे, चैताली बंसोड, निखील नैताम, शिवम काचीनवार यांचे हस्ते लाभार्थी सचिन मोहनदास मडावी, राजु मारोती वेटे, रसिका पुंडलीक रामीडवार, कांताबाई विठोबा तुनकलवार, सविता सदाशिव रामटेके यांना प्रतिकात्मक स्वरुपात गृहप्रवेश करीता घराची चाबी देण्यात आली. तसेच विहीत कालावधीमध्ये घराचे बांधकाम पुर्णकेल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले.


सावली पंचायत समिती अंतर्गत येणा-या सर्व ५४ ग्रामपंचाती मध्ये गृहप्रवेशाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.  यावेळी पंचायत समिती स्तरावरुन स्था.अ.स. रुषीकांत साखरे, विस्तार अधिकारी संजिव देवतळे, विस्तार अधिकारी राजु परसावार, विस्तार अधिकारी लक्ष्मण,अरुन मेश्राम


विस्तार अधिकारी कृषी अमोल उघडे, स.का.अ. प्रशांत भोयर, विस्तार अधिकारी बंडु, केंद्रप्रमुख जगन्नाथ वाढई, केंद्रप्रमुख किशोर येनगंटीवार, केंद्रप्रमुख रामेश्वर भोयर, किशोर बारसागडे , राजेश ताकघट, कल्पना देवाळकर, सुवर्णा नखाते, भक्तदास, निखील , वर्षा मडावी, माया लेनगुरे, संजय दुधबळे, आदि अधिकारी व कर्मचारी उपस्थिती होते.


प्रधानमंत्री आवास योजना टप्पा – २ अंतर्गत सावली तालुक्याला नव्याने लक्षांक प्राप्त झालेला आहे. सन २०२४-२५ मध्ये पात्र लाभार्थ्यांनी घरे बांधुन आपल्या हक्काच्या पक्या घराचे स्वप्न साकार करावे. असे आवाहन सावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी केले आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !