अ-हेरनवरगाव येथील अंगणवाडी केंद्रात पोषण चळवळ उपक्रमा अंतर्गत मार्गदर्शन तथा कडधान्य प्रदर्शनी कार्यक्रम संपन्न.



अ-हेरनवरगाव येथील अंगणवाडी केंद्रात पोषण चळवळ उपक्रमा अंतर्गत मार्गदर्शन तथा कडधान्य प्रदर्शनी कार्यक्रम संपन्न.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रम्हपुरी : दिनांक,१२/०९/२४ एकात्मिक बालविकास सेवा योजना ब्रह्मपुरी बळकटीकरण व पोषण सुधार कार्यक्रमांतर्गत पोषण चळवळ कार्यक्रम दिनांक ०१ सप्टेंबर २४ पासून ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव येथील अंगणवाडी केंद्रात राबविण्यात आला.



या कार्यक्रमाला उपस्थित मार्गदर्शक श्री,अमरदीप लोखंडे,श्रीमती मंजुषा कोसमसीले  अंगणवाडी पर्यवेक्षिका ,ब्रह्मपुरी, सौ.एन.एन.भोयर परिचारिका प्राथमिक आरोग्य केंद्र अ-हेर नवरगाव यांनी सौ.दामिनी चौधरी सरपंच ग्रामपंचायत अ-हेरनवरगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन व प्रतिमेला माल्यार्पण  करून त्यांना अभिवादन करुन मार्गदर्शनाला सुरुवात केली.

अंगणवाडी केंद्रात उपस्थित गावातील महिलांना पोषण चळवळी बद्दल मार्गदर्शन करताना अमरदीप लोखंडे म्हणाले की, शासनाने अंगणवाडी च्या मार्फतीने पुरविलेल्या कडधान्याचा नियमित वापर केल्यास गरोदर माता व गर्भात वाढणारे बाळ हे सुदृढ निरोगी व तंदुरुस्त राहील.



गरोदर मातांनी कोणत्याही प्रकारच्या मादक पदार्थाचे गुटखा,तंबाखू ,गुडाखू यांचे सेवन करू नये त्यापासून चार हात दूर राहावे.गुटखा याचे सेवन केल्यास प्रसूतीवर त्याचा माता आणि गर्भात वाढणारे बाळ याच्यावर विपरीत परिणाम होतो.
प्रसंगी कॅन्सर सारख्या रोगाला निमंत्रण दिल्यासारखे होते.


अंगणवाडी पर्यवेक्षिका श्रीमती मंजुषा कोसणकर म्हणाल्या की,अंगणवाडीच्या मार्फतीने अंगणवाडीत येणाऱ्या बालकाला व गरोदर माता यांना पुरविण्यात येणारे कडधान्य आणि घरी तयार करण्यात येणारी खिचडीचे कडधान्य संमिश्र पावडरची पॉकेट यांचा पुरेपूर घरी वापर करावा आणि नियमित खिचडी आणि मोड आलेले कडधान्य खाल्ले तर मेडिकलच्या औषधी आपल्याला घ्याव्या लागणार नाहीत.
मातेला बाळाला स्तनपान करण्यास दुधाची कमतरता भासणार नाही.


तसेच एन.एन.भोयर परिचारिका प्राथमिक आरोग्य केंद्र गाव यांनी आरोग्य विषयी आणि गरोदरपणाच्या सुरुवातीपासून तर प्रसूती पर्यंत जो वेळापत्रक ठरवून दिलेला आहे त्या वेळापत्रकानुसार महिलांनी लसीचे डोज पूर्ण केले तर माता आणि त्यांचे बाळ हे सुरक्षित निरोगी राहतील आणि जन्माला येणारे बाळ हे सुदृढ जन्माला येईल असा मोलाचा सल्ला त्यांनी अंगणवाडी केंद्रात उपस्थित माता-भगिनीं आणि किशोरवयीन मुलींना केला .


सदर पोषण चळवळ मार्गदर्शन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संपूर्ण अ-हेरनवरगाव येथील अंगणवाडी सेविका - सौ .अस्मिता कराणकर, सौ .मंदा वासनिक,सौ .वैशाली ढोरे, श्रीमती वनमाला वकेकार.
 मदतनीस -  सौ .अश्विनी मदनकर, सौ .भाग्यश्री ठेंगरे,
 सौ .प्रियंका दोनाडकर,सौ. तृप्ती राऊत ,सौ. पल्लवी ठेंगरे,सौ.गायत्री देवढगले,श्रीमती,अलका ढवळे यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेविका अस्मिता कराणकर यांनी बहुसंख्य उपस्थित महिलांचे मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !