कु.सलोनी डोहने " जेसिआय भारत प्रतिभा " पुरस्कार ने सन्मानीत.

कु.सलोनी डोहने " जेसिआय भारत प्रतिभा " पुरस्कार ने सन्मानीत.


राजेंद्र वाढई : उपसंपादक


मुल : ज्युनिअर चेंबर ऑफ इंडिया मूल तर्फे आयोजित जेसिआय " भारत प्रतिभा " या प्रतिष्ठेच्या पुरस्काराकरीता  नवभारत विद्यालय मूल ची प्रतिभावंत विद्यार्थीनी कु.सलोनी भिमदर्शन डोहने हिची निवड करण्यात येऊन सन्मानीत करण्यात आले आहे.


 कु.सलोनी डोहने ही वर्ग 10 ची विद्यार्थिनी आहे. कु. सलोनी ही अतिशय नम्र, आज्ञाधारक , अभ्यासू वृत्तीची विद्यार्थीनी म्हणून विद्यालयात ओळखली जाते.सुंदर हस्ताक्षर व दिलेले काम जिद्दीने,आनंदाने करण्यात तिचा हातखंडा आहे. शालेय  स्तरावरील अनेक  स्पर्धा  परीक्षा तिने उत्तीर्ण केलेल्या आहेत.ज्युनिअर चेंबर ऑफ इंडिया मूल तफै अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी च्या कायंशिलतेचा अभ्यास करून नवभारत विद्यालय मूल येथील कु.सलोनी हिची भारत प्रतिभा पुरस्कारासाठी  निवड करण्यात आली आहे.


तिला जेसिआय समुहातर्फे सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अशोक झाडे,जेष्ठ शिक्षक गुरूदास चौधरी,वगॅशिक्षक राजू बोढे यांचेसह विद्यालयातील सर्व शिक्षकांनी कु.सलोनीचे अभिनंदन केले आहे.


वर्ग शिक्षक राजू बोढे यांच्या विशेष  परिश्रमातून वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी कर्तबगार होत असल्याचे मत व्यक्त करून कु.सलोनी हिने त्यांचे यावेळी विशेष  आभार मानले.याप्रसंगी जेसिआय   ग्रुप चे अध्यक्ष  हृतिक गोयल, यश चिमड्यालवार, आशिष गोयल, अनिकेत बिरेवार हे उपस्थित होते.

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !