वन विभागाच्या अधिकाऱ्यांना खा.प्रतिभाताई धानोरकर ह्यांनी वनचराईच्या प्रश्नासंबंधी सुनावले खडेबोल.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांना खा.प्रतिभाताई धानोरकर ह्यांनी वनचराईच्या प्रश्नासंबंधी सुनावले खडेबोल.


सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेती सोबतच जोडधंदा म्हणून पशुपालन हा मुख्य व्यवसाय आहे.विशेषतः मूल व पोंभुर्णा  तालुक्यातील गोलकर, धनगर व कुरमार या  मेंढपाळ समाजाची या परिसरात  लक्षणीय संख्या असून ह्यांचा पशुपालन मेंढापाळ हा मुख्य व्यवसाय आहे. 


परंतु गेल्या काही दशकापासून वन विभागाने व  वन मंत्रालयाद्वारे  विकासाच्या नावाखाली कठोर कायदे व   विविध  अधिनियम पारित करून चराई क्षेत्र पूर्णपणे नष्ट करून  मोठ्या प्रमाणावर वने संरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे वनविभागाद्वारे वनक्षेत्रात चराई करिता पालतू जनावरे नेण्यास मजाव करण्यात येते  व अनेक वेळा मोठ्या प्रमाणावर वन कायदे अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांची पालतू जनावर जप्त करून मोठ्या प्रमाणावर दंड सुद्धा  आकारल्या जात आहे.


ही वन विभागाची मनमानी व मुजोरी  रोखून मेंढपाळ बांधावांना न्याय देण्यासाठी मेंढपाळ  समाजातर्फे येथील कांग्रेसच्या कार्यकर्त्या डॉ.अभिलाषा गावतुरे  यांच्या नेतृत्वात  वन  विभागाकडे वेळोवेळी  मागण्या करून, निवेदने देऊन त्यांचा  पाठपुरावा करण्यात आला. परंतु बेबंदशाही धोरण राबवणाऱ्या उदासिन  वन विभागाला  अजूनही जाग आलेली नाही.


 म्हणून सदरहू  प्रश्नाला वाचा फोडण्याकरिता डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या नेतृत्वात एक  शिष्टमंडळ येथील स्थानिक खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांना भेटले असता त्यांनी या विषयाचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विलंब न लावता माननीय जिल्हाधिकारी यांच्या   दालनामध्ये वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची तातडीने बैठक बोलावली.या बैठकीला  वनविभागातर्फे  वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. गादेवार हे उपस्थित होते.


मेंढपाळ बांधवांचे चराई क्षेत्र  पूर्णपणे नष्ट करणे हा प्रश्न अत्यंत गंभीर असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पालतू जनावरांच्या चराईचा  प्रश्न भीषण झाला असून येत्या काळात चराई अभावी मोठ्या प्रमाणात पालतू जनावर दगावण्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी  या समाजबांधवाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून हा समाज पूर्णपणे वाताहत  होण्याच्या मार्गावर आहे. ह्याला पूर्णपणे वनविभागाचा सुलतानी कारभार जबाबदार आहे.


करिता वनविभागाने या प्रकरणाकडे  त्वरित  लक्ष न दिल्यास दोषी वनाधिकारी यांना तात्काळ निलंबित करून गुन्हे दाखल करण्यात येतील अशी ताकीद या प्रसंगी  मा. खासदार ह्यांचेकडून  देण्यात आली.


सात दिवसाच्या आत वन विभागाने याबद्दलयात  कृती  व  अमलबजावणी कार्यक्रम  आखून  त्याचा  तातडीने पाठपुरावा करण्याचे दिशा निर्देश सुद्धा देण्यात आलेवनक्षेत्रात गवती कुराण  निर्माण करून स्थानिक ग्रामस्थांच्या पाढीव जनावरांच्या गरजा  तात्काळ पूर्ण करण्यात याव्या.मोठ्या प्रमाणावर चराई कुरण उपलब्ध करून देण्यात यावे. अश्या प्रमुख मागण्याचे निवेदन देण्यात आले.


या बैठकीला खासदार प्रतिभाताई धानोरकर, माननीय जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, काँगेसच्या कार्यकर्त्या  डॉ. अभिलाषा गावतुरे, भूमिपुत्र ब्रिगेडचेमार्गदर्शक डॉ. राकेश गावतुरे , किसान काँग्रेस सेल जिल्हाध्यक्ष दिपक  वाढई, बेंबाळ उपसरपंच देवाजजी ध्यानबोईवार,गोलकर समाजचे अध्यक्ष मंगरूजी कुरिवार, प्रशांत पुठावर, गजानन डंकरवार, विक्रमभाऊ गुरनुले, रोहित निकुरे, मल्लाजी पोतराजवार, बुद्धाजी कडलवार, देवराव शिंदे तथा पोंभुर्णा व बेंबाळ परिसरातील नागरिक   उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !