नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सामदा येथे आर्थिक मदत ; विजयकिरण फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,२७ सप्टेंबर २०२४ सावली तालुक्यातील सामदा येथे भूमिहीन शेतमजूर व विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या चार रुग्णांच्या कुटुंबियांना विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मा.दिवाकर पाटील भांडेकर व ग्राम काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.विनोद पाटील भांडेकर यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,मौजा.सामदा येथील भूमीहिन शेतमजूर सुरेश पत्रुजी कोहळे वय ४२ वर्षे तसेच अशोक वासुदेव भांडेकर वय ४५ वर्षे दोघानाही लकवा मारला असून त्यांचावर पुढील उपचार सुरु आहेत.सामदा येथील गजानन आबाजी शेंडे वय १९ वर्षे हा शालेय विद्यार्थी असून वारंवार पोटाचे विकार होत होते उपचार सुरु असताना डॉक्टरांनी गजानन ला आतड्याचे ऑपरेशन करण्यास सांगितले आहे.तसेच इंदुबाई किसन शेट्टे वय ४० वर्षे या घरातील कर्तूतवान महिला असून मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत परंतु नेहमी प्रकृति बरी राहत नसल्याने ते उपचार घेत होते डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले.
या चारही कोहळे,भांडेकर,शेंडे आणी शेट्टे कुटुंबियावर आर्थिक संकट आले. कोहळे,भांडेकर,शेंडे आणी शेट्टे आर्थिक परिस्थिती ही अतिशय बिकट आहे.मिडेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.आर्थिक संकटाला समोरे जावे लागत आहे.त्यांना आर्थिक मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांना मिळाली.
कोहळे,भांडेकर,शेंडे आणी शेट्टे या चारही कुटुंबियांना प्रत्यक्ष भेट दिली व राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आर्थिक मदत मिळवून दिली.राज्याचे विरोधी पक्षनेते नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी स्वीकारलेले जनसेवेचे व्रत व विजयकिरण फाउंडेशनच्या माध्यमातून होणारे सामाजिक उपक्रम यामुळे सामान्य नागरिकांना एक आधार प्रदान करण्याचे काम करीत आहे.गोर-गरिब सामान्य जनतेच्या हक्काचे आधारकेंद्र म्हणून विजयकिरण फाउंडेशन काम करीत आहे.
आर्थिक मदत देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,उपसरपंच मा.नितीन जुवारे,ग्रामपंचायत सदस्य मा.रुमाजी कोहळे,मा.मनोज खेवले, व्याहाड येथील काँग्रेस कार्यकर्ते मा.दीपक गदेवार तसेच माजी गाव तंटामुक्ती अध्यक्ष मा.ढीवरु पाटील कोहळे, वैशालीताई साखरे,मा.रमेश पिपरे आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.