लोकनेते माजी राज्यमंत्री स्व.वामनरावजी गड्डमवार यांचे फोटो अनावरण ; अच्छी तुम्हारी यादे,तुम चले जाते लेकीन यादे रह जाती. - सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष,संतोषसिंह रावत

लोकनेते माजी राज्यमंत्री स्व.वामनरावजी गड्डमवार यांचे फोटो अनावरण अच्छी तुम्हारी यादे,तुम चले जाते लेकीन यादे रह जाती. - सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष,संतोषसिंह रावत


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस नेते, माजी राज्यमंत्री तथा लोकनेते स्व.वामनरावजी गड्डमवार साहेब यांनी सर्वांच्या सहकार्याने मूल येथे काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काँग्रेस भवनाची निर्मिती केली.स्व.वामनरावजी गड्डमवार हेच मूल येथील काँग्रेस भवनाचे शिल्पकार होते. 



म्हणून दिनांक ६ सप्टेंबर २०२४ रोजी स्व.वामनरावजी गड्डमवार साहेब यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून कांग्रेस कमिटी कार्यालय मुल येथे स्व. वामनरावजी गड्डमवार साहेबांच्या फोटोचे अनावरण काँग्रेस नेते,सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांचे शुभ हस्ते करण्यात आले.याप्रसंगी ते बोलत होते. 


गड्डमवार साहेबांना त्यांच्या सैनिकानीच सेनापती केले, नंतर राजा केले.हा इतिहास आहे.परंतु सैनिकांच्या आपसी मतभेदांमुळे  सेनापती व राजा निरुत्तर होते म्हणून संघटन मजबूत करीत असताना मतभेद टाळा असा सल्ला आपल्या सैनिकाला रावत यांनी दिला.उपस्थित सर्वांनीच स्व.वामनराव गड्डमवार यांच्या जयंती निमित्त प्रतिमेला माला व पुष्प वाहून अभिवादन केले. 


यानिमित्त राजू पाटील मारकवार यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तर ओबीसी सेलचे सरचिटणीस गुरुदास चौधरी,दशरथ वाकुडकर,कांग्रेस जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर,व सभापती राकेश रत्नावार यांनीही गड्डमवार साहेबांच्या राजकीय कर्तबगारीचा इतिहास सर्वांसमोर ठेवला. 


कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक किशोर घडसे, सोसायटी सभापती पुरुषोत्तम     भूरसे,माजी प्राचार्य बंडू गुरनुले, विवेक  मुत्यलवार, डॉ.पद्माकर लेंनगुरे, अतुल गोवर्धन,युवक अध्यक्ष पवन नीलमवार,प्रशांत उराडे, व्यंकटेश पुल्लकवार,संदीप मोहबे,गंगाधर घुगरे


महिला शहर अध्यक्षा नलिनी आडपवार, माजी नगर सेविका लीना फुलझेले, सचिव शामला बेलसरे, ऊपाध्यक्ष समता बनसोड,सीमा भसारकर मनोज आदी कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले यांनी केले तर आभार शहर अध्यक्ष सुनील शेरकी यांनी मानले.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !