जन शिक्षण संस्थान,गडचिरोली येथे स्वच्छता पंढरवाडाचे उदघाटन.
एस.के.24 तास
गडचिरोली : दिनांक १४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार द्वारा आयोजित स्वच्छता पंधरवाडा या कार्यक्रमाचे उद्घाटन जन शिक्षण संस्थान, गडचिरोली चे संचालक मा. श्री.केशव आर. चव्हाण यांच्या मार्गदर्शना नुसार करण्यात आले.
जन शिक्षण संस्थान, गडचिरोली व इंडियन बँक येथील परिसर स्वच्छता करून परिसर स्वच्छता याविषयी जन शिक्षण संस्थांनचे संचालक, केशव आर. चव्हाण यांनी " स्वच्छता ही सेवा " या पंढरवाडा कार्यक्रमा प्रमाणे स्वभाव स्वच्छता,स्वभाव संस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदरील कार्यक्रमासाठी उदघाटक,मा.श्री. केशव आर.चव्हाण संचालक, जन शिक्षण संस्थान,गडचिरोली उपस्थित होते.
त्यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात स्वछता ही सेवा पंढरवाढा कार्यक्रमच्या नियोजन बाबत माहिती दिली. दरवर्शी प्रमाणे याहिवर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले. सर्वांनी आपले परिसर,कार्यालय व वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेण्याचे सांगितले. सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छतेमुळे होणारे विविध आजार, रोग याबाबत माहिती दिली.
तसेच यावेळी प्रमुख अतिथी श्रीमती सिंधू गाडगे महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी,गडचिरोली,श्रीमती ललिता मॅडम, पर्ववेक्षिका, मा.श्री.गजानन अलोणे सर कार्यक्रम अधिकारी जन शिक्षण संस्थान, गडचिरोली, श्रीमती यामिनी मातेरे फिल्ड सहाय्यक उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी* यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
प्रमुख अतिथी श्रीमती सिंधू गाडगे मॅडम महिला बाल प्रकल्प अधिकारी यांनी किशोरवयीन मुलींनी मासिक पाळीत वयक्तिक स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी मार्गदर्शन केले. वैयक्तिक व स्वच्छता किती महत्वाची आहे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
मा.श्री.गजानन अलोणे कार्यक्रम अधिकारी यांनी परिसर स्वच्छते बद्दल माहिती देताना म्हणाले की, आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच परिसर स्वच्छता चांगली असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी आपण राहतो, काम करतो तो परिसर स्वच्छ व सुंदर असला पाहिजे. याबाबत मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन,श्रीमती यामिनी मातेरे यांनी केले. यावेळी कार्यक्रमात सहभागी श्रीमती ज्योती उद्रपवार, श्रीमती चांगुबाई रामटेके अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. तसेच श्री. जय शिवहरे लेखापाल, श्री. अभिजित कृष्णापूरकर, नितीन चौधरी, व प्रशिक्षनार्थी व किशोरवयीन मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.