ने.हि.महाविद्यालयात स्वयंम पोर्टल वर कार्यशाळा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी पोषक.

ने.हि.महाविद्यालयात स्वयंम पोर्टल वर कार्यशाळा : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी पोषक.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : ' स्वयंम स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह - लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स ' या विषयावरील कार्यशाळा एन.एच. कॉलेज, ब्रम्हपुरीच्या स्वयंम समितीने नुकतीच रोजी आयोजित केली होती. कार्यशाळेचे संसाधन व्यक्ती डॉ. किशोर नाकतोडे, सहायक प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग, एन.एच. कॉलेज ब्रम्हपुरी हे होते. 


ब्रम्हपुरी येथील एन.एच.कॉलेजचे प्राचार्य डॉ.डी.एच.गहाणे अध्यक्षस्थानी होते तर व्यासपीठावर डॉ.ए.एन.येरपुडे, प्रा.डी.एम. परशुरामकर, प्रा.ए.पी. पवार, डॉ.एस.जी. चौधरी आणि प्रा.ए.एस. मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती होती.

       

कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे डॉ. किशोर नाकतोडे यांनी स्वयंम या विषयावर व्याख्यान दिले तसेच स्वयंम पोर्टलवर नोंदणी कशी करावी हे सांगितले. प्लॅटफॉर्मवरील काही कोर्सेसचा कोर्स पूर्ण केल्यानंतर क्रेडिट मिळवू शकणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि स्वयंम कोर्सेसचा विद्यार्थ्यांना कसा फायदा मिळावा यावर त्यांनी विशेष भर दिला. डॉ.डी.एच.गहाणे सरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की,नोकरी मिळवण्यासाठी स्वयंम प्रमाणपत्र उपयुक्त आहे. 


कार्यशाळेचे निमंत्रक डॉ.ए.एन.येरपुडे तर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डी.एम.परशुरामकर होते.प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. डी. एम. परशुरामकर यांनी केला. कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ.ए.एन.येरपुडे यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !