मुनिश्वर बोरकर
अहेरी : अन्न व औषध प्रशासन मंत्री,धर्मराव बाबा आत्राम यांची कन्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटात गेल्यामुळे अहेरी सिरोंचा विधानसभेत कांग्रेसने बाळगलेले स्वप्न धुळीस मिळण्याची शक्यता आहे.विरोधी पक्षनेते, विजयभाऊ वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक असणारे अजयभाऊ कंकडालवार यांनी माजी आमदार, दिपकदादा आत्राम यांची साथ सोडून कांग्रेसच्या खेम्यात आले तेव्हा पासून त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्र पिंजून काढला.
गोरगरीबांना मदतीचा हात,कांग्रेसचे मेळावे,सभा ,सम्मेलन घेण्यात हातखंडा आहे.चार पाच नगरसेवक राष्ट्रवादी कांग्रेस अजित दादा पवार यांचा गटात गेले जरी असले तरी काहीही फरक पडणार नाही.त्यांचे कार्यकर्ते कांग्रेस सोबत आहेत.
अशा दावा अजनभाऊ करीत आहेत.अजयभाऊ एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी दिपकदादा चा खंदा समर्थक नात्यातला मामा माजी आर.एफ.ओ.मडावी यांना कांग्रेस मध्ये आणुन कांग्रेसची उमेदवारी त्यांना देणार असल्याचे बोलल्या जात होते.
अश्यातही नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेव किरसान अहेरी विधानसभेच्या प्रत्येक गावात आपला सत्काराचा कार्यक्रम घेत असुन सोबत माजी जि.प.अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार व कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष,महेंद्र ब्राम्हणवाडे सोबती ला अहेरी विधानसभा क्षेत्र पिंजून काढत आहेत.
एवढी मेहनत घेत असतांना मध्येच माजी जि.प. अध्यक्षा,भाग्यश्री आत्राम यांनी घर फोडून राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार ) गटात नुकताच प्रवेश केल्यामुळे महाविकास आघाडीतील कांग्रेस ,उबाठा व घटक पक्ष राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार ) गट आता अहेरी विधानसभा क्षेत्रावर चाणंक्य शरद पवार मंत्री,धर्मराव बाबा आत्राम यांना सहदेण्यासाठी भाग्यश्री आत्राम यांनाच तिकिट मिळवून देणार व कांग्रेस वाल्यांना सांगणार की आता तुम्ही भाग्यश्री आत्राम यांना सहकार्य करा.
व निवडून आणा कारण मोठ्या मेहनतीने मी आत्राम चे घर फोडले आहे.अश्या परिस्थितीत मोठ्या मेहनतिने वाढवविलेला कांग्रेस पक्षाची आता गोची होणार आहे व महाविकास आघाडीचे म्हणणे कांग्रेसला मान्यच करावे लागणार आहे. कारण शरद पवारांचा शब्द कुणीही तोडू शकणार नाही.विधान सभेच्या निवडणुका जाहीर व्हायला वेळ असला तरी अहेरी विधानसभा क्षेत्रात विचित्र परिस्थिती निर्माण होत चालली आहे.
महायुतीमधे भाजपा,राष्ट्रवादी कांग्रेस (अजीत पवार) गट व शिवसेना यात अजीत पवार गटातील व मंत्री असलेले धर्मराव बाबा आत्राम यांनाच तिकीट मिळणार हे सांगायला कोण्या जोतिष्याची गरज नाही.परंतु बाबाच्या घरफोडीत मात्र मंत्री मोहदयांना फार मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
कारण माजी मंत्री,राजे अब्रीशराव महाराज हे जरी भाजपाचे असले तरीही त्यांना भाजपाची तिकीट मिळणे सोपे नाही.उशिरा झोपून उठणारे अब्रीशराव महाराज आता मात्र सकाळी १० वाजता च घराबाहेर पडतात व अहेरी विधानसभा क्षेत्रात सभा,संमेलन धुमधळ्याक्यात घेत आहेत.ते असे म्हणतात की भाजपने मला तिकिट देवो अथवा न देवो मी निवडणुक लढविणारच जनता माझ्या पाठीसी आहे.
आणि मी जिंकणारच कारण मी माझ्या मंत्री काळात कुण्या कर्मचाऱ्यांना त्रास दिला नाही,भ्रष्टाचाराचा डाग माझ्यावर नाही मी सुरजागड लोह खनीजा वाल्यांचा दबिल नाही असा दावा करून मी जिंकणारच असे सभेमधे गर्जना करीत आहेत.माजी आमदार,दिपक दादा आत्राम हे कोणत्या पक्षा कडून लढणार हे कळायला मार्गच नाहीं.