तथागत बुद्धांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेण्यासाठी पुणेकराची गर्दी ; पवित्र अस्थिकलशाचे दर्शन घेतांना मनाला शांती मिळतो.पुज्य भन्ते फाराथुंवा तुवंणो श्रीलंका.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
पुणे : महाकारुणीक तथागत भगवान बुद्ध व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलस महायात्रा पुणे शहरात पोहचताच ५०० वर्षापूर्वीचे बुद्धाचे अस्थिकलश्याचे दर्शन घेण्याकरीना पुण्यातील उपाषक व उपाषिकांची पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून मोठी गर्दी जमली होती.
इंडो एशिया मेत्ता फाऊडेशन इंडिया तर्फेदि. १० संष्टेबर २०२४ ला सांयकाळी ६ वाजता बुद्ध वाटिका मुंकदराव आंबेडकर चौक शेजारी विश्रांतवाडी पुणे येथे पुज्य भन्ते फाराथुंवा जिरामेघी तुवंणो श्रीलंक व जागतिक बौद्ध संघटनेचे अध्यक्ष डॉ. पालामो धम्मो पोचाई तर भन्ते मोस्टवेन रेवत श्रीलंका , भन्ते पारावेचाई कोंनक श्रीलंका , धम्म मास्टर चिमुंगकुत्तार,आक्कारानाधाचिन आदिच्या प्रमुख उपस्थितीत तर सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांचे हस्ते उद्घाटन पार पडले.
तर सुरेशदादा पठारे,भन्ते झेन मास्टर सुदर्शन नितीनजी गजभीये नागपूर सामाजिक कार्यकर्ता विवेक बन्सोड , युवराज बनसोडे निलेश आव्हाड,वाघमारे साहेब यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सर्वप्रथम पुणे शहरात धम्मफेरी काढण्यात आली व त्रिशरण,पंच शिला ग्रहण केल्यानंतर तथागत बुद्धांच्या अस्थिकलसाचे दर्शन घेण्यात आले.सुरेशदादा पठारे यांच्या तर्फे भिक्खू संघाला चिवरदान व खिरदान देण्यात आली.
महाराष्ट्र शासनाने श्रीलंका ,थॉयलड भिक्खू संघ यांना राज्य अतिथीचा दर्जा दिलेला असुन शासनाने सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. याप्रसंगी पुज्य भन्तेगण यांनी मोलाचे मार्ग दर्शन कार्यकमास बहुसंख्य उपाषक - उपाषिका उपस्थित होते.