पोर्ला येथे करिअर मार्गदर्शन मेळावा व गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न. ★ मॅजिक बस इंडिया फांऊडेशन गडचिरोली,ग्रामपंचायत पोर्ला व शिवाजी कला कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने.

पोर्ला येथे करिअर मार्गदर्शन मेळावा व गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न.


मॅजिक बस इंडिया फांऊडेशन गडचिरोली,ग्रामपंचायत पोर्ला व शिवाजी कला कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने.


अरुण भैसारे !! प्रतिनिधी,पोर्ला !!


गडचिरोली : दिनांक 10 सप्टेंबर 2024 ला मॅजिक बस  इंडिया फांऊडेशन गडचिरोली संस्था,  ग्रामपंचायत पोर्ला व शिवाजी कला कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी कला कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला येथे करिअर मार्गदर्शन मेळावा व गुणवंतांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले.

विद्यार्थ्यांनी कधीही हार न मानता मोठी स्वप्न बघावी आणि ध्येयाच्या दिशेने सतत वाटचाल करावी त्या सोबत MPSC आणि UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये देखील परिश्रमाने यश गाठता येतो आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील अधिकारी होऊ शकतात असा संदेश कार्यक्रमाचे  उद्घाटक तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले मा. श्री. एस. डी. गोंगले साहेब गट विकास अधिकारी पंचायत समिती गडचिरोली यांनी दिला.  



शालेय जीवनात आणि ध्येय साध्य करण्याच्या मार्गावर अनेक समस्या येत असतात मात्र मॅजिक बस संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये रुजविले जाणारे समस्यांचे निराकरण, संवाद कौशल्य, गटकार्य यांसारखे जीवन कौशल्य आपले करिअर घडविण्यासाठी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना सक्षम करतात यावर प्रकाश टाकण्याचं काम सह-उद्घाटक घाटक म्हणून लाभले मा. प्रशांत लोखंडे सर वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन, गडचिरोली यांनी केलं. 


करिअर घडविण्याच्या मार्गावर अनेक अडचणी तर येतीलच मात्र विद्यार्थ्यां पासून तर अधिकारी होण्या पर्यंतचा प्रवास कस गाठावं, आपल्या अभ्यासच नियोजन, वेळेचं नियोजन कसे करावे यावर सखोल असे मार्गदर्शन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून लाभलेले मा. डी. के. लाटेलवार सर ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत पोर्ला यांनी केले. 


कार्यक्रमाच्या दरम्यान सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक मा. कोठारी सर जि. प. उच्च प्राथ शाळा पोर्ला, यांच्या अमुल्य योगदाना बाबत शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन मा. गोंगले साहेब गटविकास अधिकारी पंचायत समिती गडचिरोली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शालेय परीक्षेत विशेष प्रावीन्य मिडविणाऱ्या गुणवंतांचा आणि स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करून शासनाच्या विविध पदावर रुजू झालेल्या नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. 


सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ. निवृत्ती राऊत सरपंच ग्रामपंचायत पोर्ला यांची प्रमुख  उपस्थिती होती तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. डी. एम. दिवटे सर मुख्याध्यापक शिवाजी विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालयात पोर्ला यांची उपस्थिती होती. तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.    

  

सदर कार्यक्रमाची सुरुवात मा. आकाश गेडाम प्रकल्प व्यवस्थापक  मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन गडचिरोली यांच्या प्रास्तविकेतून झाली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. श्री. जी. गायधने सर शिवाजी कला कनिष्ठ महाविद्यालय पोर्ला यांनी केले, तर सरते शेवटी मॅजिक बस संस्थेचे विषय शिक्षक अनिल खोब्रागडे यांनी सर्वांचे आभार मानले.


कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी  सर्व ग्रामपंचायत सदस्य पोर्ला, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद, जीवन कौशल्य शिक्षक मा. लेखाराम हुलके  आणि  समुदाय समन्वयक कु. डिम्पल म्हशाखेरी यांनी अथक परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !