संयुक्त रिपब्लिकन आघाडीचा मेळावा संपन्न.
★ तुटलेले परिवार आता फेव्हिकॉल ने जोडू या. - प्रा. जोगेंद्र कवाडे ; नो कांग्रेस,नो बिजेपी,फक्त रिपब्लिकन.
गडचिरोली - मुनिश्वर बोरकर
नागपूर : बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संयुक्त रिपब्लिकन आघाडी ने ' रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा संकल्प केला.रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस तसेच राज्यसभेचे माजी उपसभापती स्मृतिशेश नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षात रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा संकल्प करत आहोत असे संयुक्त रिपब्लिकन आघाडी चे अध्यक्ष,अमृतराव गजभिये यांनी म्हटले आहे.
नागपूर येथे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह मध्ये संकल्प मेळाव्यात बोलत होते काही लोक रिपब्लिकन पक्ष संपविण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र संयुक्त रिपब्लिकन आघाडी ही सर्व नेत्यांना एकत्र करून एक संघ रिपब्लिकन पक्षआम्ही प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते जिद्दीने रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहोत.पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांनी एक परिवार म्हणून एकत्र येवून या तुटलेला परिवार फेव्हीकॉल ने जोडावा लागेल.धोरण असे अखायचे की शत्रू चारही मुंड्या चित्त झाला पाहिजे.
रिपब्लिकन पक्ष खोब्रागडे चे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील रामटेके यांनी एक प्रतिनिधी नागपूर मध्ये निवडून आला पाहिजे बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे नी पूर्ण भारतात काम केले आहे आणि रिपब्लिकन पक्ष भारतात उभा केला.आणि नागपूर ची ज्वाला पूर्ण भारतात पसरते असे उदगार केले.
या वेळी माजी आमदार उपेंद्र शेंडे यांनी सांगितले की बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी आयुष्यभर काँग्रेस विरोधात काम केले आहे असे असताना यावेळी लोकसभा निवडणुकीत संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता.त्यांनी रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा संकल्प केला व स्वबळाची घोषणा केली.
तसेच शिक्षणमहर्षी रमेश फुले यांनी रिपब्लिकन पक्ष आज काळाची गरज आहे.जी पर्यंत रिपब्लिकन आंबेडकरी जनता निळ्या झेंड्याखाली येणार नाही तो पर्यंत आम्ही स्वाभिमानाने जगूच शकत नाही.यावेळी समता सैनिक दल चे अशोक बोंदाडे आघाडी चे मुख्य संयोजक प्रा.डॉ.प्रदीप बोरकर,संयुक्त रिपब्लिकन आघाडी,भंडारा चे चंद्रशेखर टेंभूर्णे,अमरावतीचे ऍड.डॉ.पी.एस.खडसे,दिनेश गोडघाटे कैलाश बोंबले,प्रकाश कुंभे,यांनी ही आपले विचार मांडले.प्रास्ताविक विश्वास पाटील,संचालन बाळूमामा कोसमकर, आभार शेषराव गणवीर यांनी केले.कार्यक्रमाला रिपब्लिकन जनतेचा भरघोस प्रतिसाद मिळाला.
वरील मेळाव्यात घटक पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.रमेश गेडाम,रामदास गजभिये,पँथर अनिल मेश्राम,राज सुखदेवे, मनोहर गायकवाड,दीपक डोंगरे सुधीर पाटील,दिनेश ढोके हंसराज मेश्राम,शेखर पाटील डॉ.चरणदास जनबंधू,अशोक भिवगडे,गोपीचंद अंभोरे,गौतम सातपुते,सुनील इलमकर,कैलाश हिवराळे,सुधाकर टवले,कृष्णा पाटील,सौ.सुधा जनबंधू,सौ.कांचन जांभूळकर,सौ.रेखा वाहने,संजीवन वालदे,धनराज शेंडे,आदी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
अशी माहिती संयुक्त रिपब्लिकन आघाडी चे, संयोजक,प्रसिद्धी प्रमुख,प्रकाश कुंभे यांनी दिली आहे.