आय.सी.टी.च्या माध्यमातून घेतले जात आहे शिक्षणाचे धडे.
एस.के.24 तास
चंद्रपूर : समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील 2273 शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित केल्या असून प्रत्येक शाळेवर या संगणक प्रयोगशाळेसाठी एक इन्स्ट्रक्टर सुद्धा रुजू करण्यात आलेले आहे,आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल व ते शिकावं पण लागेल.
जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी व नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी कॉम्पुटर हे महत्वाचे साधन आहे.हे उद्दिष्ट समोर ठेवून, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई,राज्य प्रकल्प संचालक श्रीमती,आर.विमला मॅडम यांनी आय.सी.टी. (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी)हा उपक्रम राबविण्याचे योजिले आहे.
या उपक्रमाचा मुलांना खूप चांगल्या प्रकारे फायदा होत आहे. आणि ते आनंददायी वातावरणात शिकत आहेत.यामध्ये आपल्या चंद्रपूर जिल्ह्यातील 45 शाळेमध्ये हा उपक्रम चालू असून, अतिशय चांगल्या प्रकारचा उपक्रम राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई,
श्रीमती.आर.विमला मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे व चंद्रपूर जिल्ह्याचा शिक्षणाधिकारी श्रीमती अश्विनी सोनवणे मॅडम(प्रा.) यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात येत आहे, नक्कीच या उपक्रमातून विद्यार्थांना चांगले भविष्य घडविण्यास मदत होत आहे येणाऱ्या काळात या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा आहे.