विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे निफंद्रा येथे आर्थिक मदत.
एस.के.24 तास
सावली : दिनांक :- २१ सप्टेंबर २०२४ तालुक्यातील मौजा.निफंद्रा येथे दुर्दर आजाराने ग्रस्त शेतकर्याच्या कुटुंबियाना विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव बंडू पाटील बोरकुटे तसेंच सावली तालुका अध्यक्ष नितीन गोहने यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,मौजा.निफंद्रा येथील युवा शेतकरी आकाश दयाराम मारभते वय ३२ वर्षे हे भूमिहीन शेतमजूर होते, घरातील आर्थिक स्थिती नाजूक असून मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, सिकलसेल असल्याने वारंवार तबेत खराब असल्याने ते उपचार घेत होते परंतु प्रकृतीत काही सुधारणा न झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना आर्थिक मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांना मिळाली आज मारभते कुटुंबियांना भेट दिली व राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आर्थिक मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना बोथलीचे उपसरपंच नरेश पाटील गड्डमवार,भक्तदास दहलकर,रुपेश आभारे,प्रेमदास भोयर,सदानंद मारभते आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.