बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाकरिता,संतोषसिंह रावत यांच्या कडे बदल घडविण्यासाठी आमदार म्हणून निवडून आणण्याचा झंझावात घराघरात पोहचू लागलाय.


बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाकरिता,संतोषसिंह रावत यांच्या कडे बदल घडविण्यासाठी आमदार म्हणून निवडून आणण्याचा झंझावात घराघरात पोहचू लागलाय.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


मुल : आगामी होवु घातलेल्या राज्य विधानसभेच्या निवडणुकी करीता बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाकरिता  संतोषसिंह रावत यांच्याकडे बदल घडविण्यासाठी आशेने किरण म्हणून बघितलं जात आहे.गोरगरिबांच्या कल्याणासाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातिल प्रत्येक गावात,प्रत्येक वार्डात संतोषसिंह रावत यांना आगामी विधानसभा निवडणुकीत बदल घडवून आणण्यासाठी कार्यकर्ते नेटाने प्रयत्न करीत आहेत. धडाडीने नेतृत्वगुण असलेले संतोषसिंह रावत यांच्या कडे कमालीचा कामाचा आवाका,सामाजिक दृष्टीकोण आणि दूरदृष्टी आहे.



माता दुर्गा,माता शारदा आणि विर हनुमानजींचे निस्सीम भक्त असलेले दानशुर व्यक्तीमत्वाचे धनी असलेले आपले संतोषभाऊ यांनी राजकीय क्षेत्रासोबतच सामाजिक,शैक्षणिक, सहकार,कृषी,क्रिडा, धार्मिक आदी क्षेत्रात अनेक लोकोपयोगी, विधायक, हितावह आणि सेवेचे उपक्रम राबवुन विधानसभा क्षेञात लौकीक प्राप्त केला असल्यामुळे जनता संतोषसिंह रावत यांच्या कडे आगामी आमदार म्हणून बघू लागली आहे.


संतोषसिंह रावत यांनी कोरोना काळात तीन महीने विनामुल्य अन्नपुर्णा थाली उपक्रम राबविला.गरजवंताना विनामुल्य आँक्सीजन सिलेंडरसह औषधोपचार आणि रुग्णवाहिकेची सेवा दिली.युवकांच्या शारिरीक विकासासाठी युवाशक्ती व्यायाम शाळेच्या माध्यमातुन कुस्ती,कबड्डी, क्रिकेट आदी स्पर्धांचे आयोजन केले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातुन दुर्धर रूग्णांना औषधोपचारा करीता आर्थिक सहकार्य, गरजवंत शेतकरी बंधु भगीनीना सहकार्याचा हात दिला आहे. 



राजीव गांधी स्वावलंबन योजनेमधुन रोजगाराची संधी दिली आहे. जिल्हा परीषदेच्या अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यातील प्रत्येक गावांत भेटी देवुन अनेकांना योजनाचा लाभ मिळवुन दिला आहे.या त्यांच्या लोकोपयोगी कामांमुळे जनतेनी संतोषसिंह रावत यांना बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत आगामी विधानसभा निवडणुकीत निवडून आणण्याचे ठायी ठायी ठरविल्याचे दिसून येत आहे.दुर्गा मंदीर आणि हनुमान मंदीराच्या निर्मिती मधुन दरवर्षी धार्मिक व सामाजीक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असलेल्या संतोषसिंह रावत मागील वर्षी शासनाची योजना किंवा आर्थिक मदतीविना स्वनेतृत्वात मूल येथे विनामूल्य भव्य आरोग्य शिबीर आणि औषधी वितरण करून माणुसकीचा प्रत्यय घडवुन दिला आहे. 


समाजातल्या विविध क्षेत्रात पदार्पण केल्यापासुन संतोषसिंह रावत यांनी कधीही मागे वळुन पाहीले नसुन पद असो वा नसो समाज व जनसेवा हीच ईश्वरसेवा माणुन आजही क्रियाशिल आहेत. संतोषसिंह रावत यांनी आजवरच्या जीवन प्रवासात १९९६ ते १९९८ पर्यंत मूलचे नगराध्यक्ष, १९९५ ते २००१ पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद, २००२ पासुन आजतागायत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पद भुषवितांना आपल्या सर्वांचे स्नेह, सहकार्य, आशिर्वाद आणि मार्गदर्शनामूळे २०२० पासुन बँकेच्या अध्यक्षपदाची धुरा निस्वार्थपणे सांभाळत आहेत.  


२००७ ते २००९ या काळात जिल्हा परीषदेच्या अध्यक्ष पदाची धुरा सांभाळणारे संतोषसिंह रावत मूल येथील स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्थेचे संचालकही आहेत. असा विविधांगी प्रवास असलेले आपल्या सर्वांचे लाडके असलेल्या संतोषसिंह रावत यांना आमदार म्हणून पाठविण्याचे बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातिल जनतेनी ठरविल्याचे चित्र आहे.


दमदार,दिलदार,दानशुर आणि जनतेमध्ये राहुन समाजाप्रती बांधीलकी जोपासणा-या संतोषसिंह रावत यांना एकीच्या वज्रमुठीने बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून निवडून आणण्याचा झंझावात घराघरात पोहचू लागलाय.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !