जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण व कुणबी समाजाचे महाधिवेशन ; कुणबी समाजासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,०५/०९/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील कुणबी समाजाचे आराध्य जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण व समाज परिवर्तनाच्या दिशेने एकत्र येण्याचा ध्यास घेतलेल्या कुणबी समाजासाठी तालुका स्तरीय कुणबी महाधिवेशन दि.०८ सप्टेंबर २०२४ रविवारला सकाळी ११ वाजता स्व.मदन गोपालजी भैया ने.हि.महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे आयोजित करण्यात आले आहे.
या महाधिवेशनाचे प्रमुख उद्दिष्ट कुणबी समाजाच्या उज्ज्वल भविष्याची नांदी घालणे आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपले विचार, दृष्टिकोन, आणि कल्पना या अधिवेशनात मांडून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या आयोजनातून व्यक्त करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दामोधरजी मिसार संचालक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपूर तर सत्कारमूर्ती व उद्घाटक प्रतिभाताई धानोरकर खासदार चंद्रपूर लोकसभा क्षेत्र व डॉ. प्रशांत पडोळे खासदार भंडारा लोकसभा श्रेत्र तसेच प्रमुख अतिथी म्हणून सुभाषजी धोटे आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र, डॉ.परिणय फुके आमदार विधानपरिषद, तसेच प्रमूख मार्गदर्शक प्रदीप वादाफडे, सुनिलजी फुंडे,प्रमूख पाहुणे अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपुरीचे अध्यक्ष ऋषीजी राऊत, अर्जुनजी भोयर अध्यक्ष कुणबी समाज मंडळ सावली, डॉ. लेमराजजी लडके अध्यक्ष कुणबी समाज मंडळ सिंदेवाही आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत .
कुणबी समाजाचे आराध्य जगदगुरू संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण व कुणबी महाधिवेशन कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल कुणबी समाज मंडळ, कुणबी समाज संघर्ष समिती, कुणबी महीला मंडळ ब्रम्हपुरीचे पदाधिकारी यांनी केले आहे..