जन शिक्षण संस्थान,गडचिरोली च्या माध्यमातून विविध ठिकाणी " शिक्षक दिन " साजरा करण्यात आला.

जन शिक्षण संस्थान,गडचिरोली च्या माध्यमातून विविध ठिकाणी " शिक्षक दिन " साजरा करण्यात आला. 


सुरेश कन्नमवार !! मुख्य संपादक !!


गडचिरोली : दिनांक 5 सप्टेंबर 2014 रोज गुरुववारला जन शिक्षण संस्थान,गडचिरोली सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.केशव आर.चव्हाण साहेब संचालक " जन शिक्षण संस्थान,गडचिरोली " हे उपस्थित होते.तर प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.गजानन अलोणे सर कार्यक्रम अधिकारी जन शिक्षण संस्थान गडचिरोली हे उपस्थित होते. 

कार्यक्रमांची सुरुवात द्विप प्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला मा.संचालक यांच्या हस्ते माळ्यार्पण करण्यात आले.श्री.गजानन अलोणे कार्यक्रम अधिकारी यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले.ते पुढे म्हणाले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे तत्वज्ञ्  होते, यांच्या जीवन पटलावर प्रकाश टाकला. तसेच उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. 


 मा.श्री. केशव आर.चव्हाण संचालक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन चरित्रबद्दल मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी झाला.आणि 17 एप्रिल 1975 ला त्यांचा देहवसान झाले.मुळंचे राधाकृष्णय्या हे एक भारतीय राजकारणी तत्वज्ञ आणि राजकारणी होते. ज्यांनी 1962 ते 1967 या काळात भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून काम केले. 


 डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णनयांनी यापूर्वी भारताचे पहिले उपाध्यक्ष म्हणून 1952 ला काम पहिले. 19 62 ते 1962 पर्यंत ते 1949 ते 1952 सोव्हीयत युनियनमध्ये भारताचे दुसरे राजदूत होते. बनारस हिंदू विद्यापिठाचे व आंध्र विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू होते.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना 1954 मध्ये भारतातील सर्वोच्च नगरी पुरस्कार भारतरत्न आणि 1963 मध्ये ब्रिटिश रॉयल ऑर्डर  ऑफ मेरिटचे मानद सदस्यत्व असे अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा असा विश्वास होता की, " शिक्षक हे देशातील सर्वोत्तम विचारांचे असावेत" असे त्यांना वाटतं होते. 


 या कार्यक्रमचे सूत्रसंचालन नितेश चौधरी यांनी केले तर आभार अभिजित कृष्णापुरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता नितेश चौधरी, अभिजित कृष्णापुरकर, व इतर कर्मचारी व विध्यार्थी यांनी सहकार्य केले.जन शिक्षण संस्थान, गडचिरोली च्या वतीने प्रशिक्षण केंद्र धानोरा येथे प्रशिक्षिका सौ.पिंकी भैसारे,सौ.वेणू मश्याखात्री,स्नेहल भैसारे व प्रशिक्षनार्थी उपस्थित होत्या. तसेच जन शिक्षण संस्थान गडचिरोली च्या प्रशिक्षण केंद्र कडोली तालुका कुरखेडा येथे " शिक्षक दिन " साजरा करण्यात आला. 


येथे सौ. सोनू जिकुंवार नगरसेविका यांच्या अध्यक्षतेखाली सदरील कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती यामिनी मातेरे फिल्ड सहाय्यक, गडचिरोली,सौ.त्रिशला इंदुरकर अंगणवाडी सेविका, तसेच सौ. भारती कोसरे.प्रशिक्षिका व मोठ्या संख्येने प्रशिक्षनार्थी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !