महिला बचत गटाचे संघटन मजबूत झाल्याने सावकारी मक्तेदारी बंद झाली ; वाघाच्या मनुष्य हल्याबाबत महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन आंदोलन करावे. - संतोषसिंह रावत

महिला बचत गटाचे संघटन मजबूत झाल्याने सावकारी मक्तेदारी बंद झालीवाघाच्या मनुष्य हल्याबाबत महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन आंदोलन करावे. - संतोषसिंह रावत

 

मिथुन कलसार - ता.प्र.मुल


मुल : दिनांक,०५ सप्टेंबर २०२४ महिला बचत गटाची निर्मिती झाल्यानेच सावकारी मक्तेदारी बंद झाली व महिला महिला सक्षम आत्मनिर्भर होऊन एकत्र संघटित झाल्या याचा बँकेला अभिमान आहे.परंतु आपल्याच भागात एका आढवड्यात पाच व्यक्तीला वाघाने हल्ला करुन ठार केले. असं किती दिवस चालणार यासाठी बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेऊन वनविभागा समोर आंदोलन करावे व शासनाला जागे करावे असे आव्हान उपस्थित दोन हजार महिलांना व शेतकरी बांधवांना बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांनी केले. 

९२ कोटी नफा प्राप्त करून महाराष्ट्रात ५ व्या विदर्भात २ ऱ्या स्थानावर असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नांदगाव येथे आयोजित महिला बचत गट व शेतकरी मेळावाच्या अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते.तसेच नोटाबंदी कशी फसवी झाली याचाही खरपूस समाचार घेतला.

बँकेच्या नफ्यातून संचालक मंडळाच्या सहकार्यानेच राजीव गांधी स्वावलंबन योजना,कॅन्सर,दुर्धर आजार,विजपडून मृत्यू,वाघाने ठार झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत,साप चावल्याने मदत अशा शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना सुरु केल्याने यात आपलाच मोठा वाटा व सहकार्य आहे.याबद्दल सर्वांना धन्यवाद देत आभार मानले.                                 


याप्रसंगी बचत गटाचे महत्व महिलांची भूमिका यावर संचालिका प्रा. प्रभाताई वासाडे यांनी मार्गदर्शन केले.तर संचालिका नंदाताई अल्लुरवार यांनी सहकारी बँकेची निर्मितीच महिलांच्या सक्षमीकरणासाठी झाली.असे विस्तृत विचार व्यक्त केले. 


ज्येष्ठ संचालक डॉ.ललित मोटघरे यांनीही संतोष भाऊ रावत यांच्या कारकीर्दीत अनेक विकासात्मक योजना राबऊन बँक प्रगती करीत असल्याचे सांगितले. सरपंच हिमानी वाकुडकर, दशरथ वाकुडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.                        


याप्रसंगी प्रमुख माजी संचालक विनायक बुग्गावार ,राजू पाटील मारकवार, सोसायटी अध्यक्ष घनश्याम येनुरकर,गणेश खोब्रागडे,संचालक सुमित आरेकर,गुरु गुरनुले, प्रकाश आंबटकर,मा उपसभापती दशरथ वाकुडकर, अध्यक्ष अनिल मुंगेलवार, प्रदीप कामडे, उषा शेरकी,अनिल निकेसर,विकास सीडाम,यांचेसह सहकारी सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते. 


कार्यक्रमाचे संचालन शंकर बोडे, प्रास्ताविक सहा व्यवस्थापक मंगल बुरांडे,यांनी केले. मेळाव्याच्या आयोजनासाठी वि.अ.प्रशांत तोटावार, राज दर्वे,हेमराज सोमलकर,अधिकारी विनोद पाझरे,व्यवस्थापक राहुल साळवे,निरीक्षक हेमंत भोपये, यांचेसह आजी माजी अधिकारी कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !