नामदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे हिरापूर येथे आर्थिक मदत ; भूमिहीन शेतकऱ्यांना विजुभाऊंचा आधार.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,२६ सप्टेंबर २०२४ तालुक्यातील मौजा.हिरापूर येथे भूमिहीन शेतमजूर असलेल्या दोन कुटुंबियांना विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे हिरापूर येथील सरपंच सौ.प्रीतीताई गोहने व उपसरपंच मा.शरद कन्नाके यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की,मौजा.हिरापूर येथील भूमीहिन शेतमजूर तसेच कुटुंब प्रमुख स्व. गणेश भोपये वय ३८ वर्षे यांचे दुर्दर आकस्मिक निधन झाले त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे,कुटुंब प्रमुख गेल्याने भोपये कुटुंबावर आर्थिक संकट आले.तसेच स्व.प्रेमानाथ कन्नाके वय ४२ वर्षे हे सुद्धा भूमिहीन शेतमजूर होते घरातील आर्थिक परिस्थिती ही अतिशय बिकट आहे.
मिडेल ते काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते,वारंवार तबेत खराब झाल्या कारणाने ते पुढील उपचार घेत होते,प्रकृती सुधारणा होऊनही दुर्दैवी मृत पावले त्यांचा पश्चात खूप मोठा परिवार आहे.दोन्ही भोपये व कन्नाके कुटुंबियांना कुटुंब प्रमुख गेल्याने आर्थिक संकटाला समोरे जावे लागत आहे.
छोटा मोठा व्यवसाय करून उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांना आर्थिक मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने यांना मिळाली.आज भोपये व कन्नाके कुटुंबियांना प्रत्यक्ष भेट दिली व राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून तात्काळ आर्थिक मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना ग्रामपंचायत सदस्य मा.रुमाजी कोरडे,सौ.निता मुनघाटे,सौ.माधुरी आत्राम,सौ.सरिता भोयर,गाव तंटामुक्ती अध्यक्ष मा.कालिदास मेश्राम,सामाजिक कार्यकर्ते मा.रघुराज शेडमाके, मा.प्रकाश आत्राम आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.