राज्य शासनाच्या फसवेगीरीचे विरोधात हजारो महिलांचा मोर्चा व जेलभरो आंदोलन.

राज्य शासनाच्या फसवेगीरीचे विरोधात हजारो महिलांचा मोर्चा व जेलभरो आंदोलन. 


 मुनिश्वर बोरकर - गडचिरोली


गडचिरोली : वारेमाप घोषणा करणारे व फसवी आश्वासने देणारे महाराष्ट्र शासनाचा अंगणवाडी महिलांना विटआल्यामुळे आज दि. ९ सप्टेंबर ला दुपारी १ वाजता गोंडवाना सांस्कृतिक भवन धानोरा रोड पासुन इंदिरा गांधी  हजारो अंगणवाडी महिलांचा मोर्चा निघाला व त्याचे रुपांतर जेलभरो आंदोलनात झाले.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधान वाढ ,पेंन्शन तथा ग्रंज्युटी लागु करण्याचे लेखी आश्वासन देऊन सुद्धा एकाही मागण्याचे पुर्तता अजुनपर्यंत केली नाही त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा धिक्कार करण्यासाठी चंद्रपूर - गडचिरोली जिल्हयातील हजारो अंगणवाडी महिलां एकवटून शासनाचा धिक्कार केला. 


सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अमलबजावणी करून अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी लागु करा. मलेरिया कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी आदि मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता पुढे मोर्च्याचे रुंपातर सभेत करण्यात आले यात संघटनेचे अध्यक्ष प्रा.रमेशचंद्र दहिवले,अमोल मारकवार,किशोर जामदार,विठाभाई भट आदिनी मोर्च्याला संबोधित केले. जवळपास पाच हजार अंगणवाडीमहिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या अशी माहिती,सुनंदा बावणे यांनी दिली. 


शारदा लेनगुरे,उज्चला उंदिरवाडे,ललिता केदार, कौशल्या गौरकर,ककीराजी ठेंगणे,सुदाम भागडकर, योगीता मुनघाटे,यामीनी झंझाड , सुशिला कार , भागीरथा दुधबावरे , मालुताई कामगार माया सेडमाके , विमल कमरो , सुमन संयाम आदिनी अथक परिश्रम घेतला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !