आदिवासीच्या नोकऱ्या बळकविणाऱ्या बोगस आदिवासींना नोकरीतून खाली करा.- निताराम कुमरे
मुनिश्वर बोरकर
आरमोरी : आदिवासी समाजाच्या नावाखाली गैरआदिवासी समाजातील लोकांनी नोकऱ्या बळकावल्या आहेत अश्यांना सेवेतून खाली करावेआदिवासींच्या विविध ज्वलंत समस्याकडे कांग्रेस पक्षानेलक्ष घ्यावे ' पेसा अंतर्गत नोकर भरती रेंगाळली आहे.
सदर भरती प्रक्रिया शासनाने त्वरीत सुरु करावी शासकीय शाळा कॉन्ट्राकदाराकडे देवू नये , आदिवासी बांधव बेरोजगार आहेत त्यांना रोजगार घ्यावा आदि समस्या निताराम कुंमरे सेवानिवृत्त आयुक्त तथा आदिवासी नेते यांनी आदिवासींच्या चिंतन बैठकीत केले.आदिवासींच्या विविध ज्वलंत समस्यावर सामुहिक चिंतन बैठक व उपाय योजना चर्चा क्षेत्र स्वागत सिलेब्रेशन हाल आरमोरी येथे सेवानिवृत आयुक्त,निताराम कुंभरे यांच्या अध्यक्षतेखाली तर कांग्रेसचे खासदार डॉ.नामदेव किरसान यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.
सदर चर्चा सत्रात आदिवासींच्या विविध समस्यांवर प्रत्यक्ष उत्तर देण्याकरिता आपल्या गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार सन्माननीय डॉ.नामदेवरावजी किरसान यांनी समाज बांधवांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांचे उत्तर दिले.आणि लवकरच आदिवासींच्या मूळ समस्या संसदेत मांडणार याबद्दल त्यांनी हमी दिली.
सोबत यात विविध संघटनेतील पदाधिकारी-तज्ञ व्यक्ती ज्यांनी या समस्यावर तोडगा काढण्यासाठी पत्रव्यवहार केलेलें होते ते सर्व मान्यवरांनी मार्गदर्शन केले व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि समस्यांवर उपाययोजना सुचवल्या.
या प्रसगी माजी आमदार रामकृष्ण मडावी,माजी आमदार हरिरामजी ,रामदासजी मसराम सामाजिक कार्यकर्ते डॉ.नीलकंठजी मसराम 'पंधरे सर(प्राचार्य M.G. महाविद्यालय आरमोरी), मनीष हलामी ( तालुका अध्यक्ष AIAIF कोरची)अमित कोराम( मंडळ अधिकारी ब्रह्मपुरी) , प्रा. दौलत दादा धुर्वे(शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते आरमोरी),नितीनजी पदा,शिवाजी नरोटे , कुणाल कोवे,विश्वेशराव दर्रो 'करण सयाम सर, प्रशांत किनाके सर, मा.विनोद मडावीआदीची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अनिल होळी सर (आदर्श महाविद्यालय देसाईगंज) यांनी केले, प्रस्ताविक प्रशांतजी मडावी (जिल्हाध्यक्ष गों ग.पा.गडचिरोली )यांनी केले, तर आभार अनिल दादा केरामी (संयोजक गोटुल सेना गडचिरोली) यांनी व्यक्त केले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात मुख्य सहयोग प्रशांत मडावी( जिल्हाध्यक्ष गों ग.पा.गडचिरोली)मा.गणेशजी वरखडे ( जिल्हाध्यक्ष बिरसा ब्रिगेड गडचिरोली) मा.श्याम कुडमेथे (बिरसा ब्रिगेड गडचिरोली),मा.राजू दादा पारसे (वडसा) आदिचे सहकार्य लाभले.