ब्रम्हपुरी स्थानकावर आता तात्काळ तिकिट ची सोय ; झेडआरयुसीसी बैठकीत,संजय गजपुरे यांनी मांडलेल्या मागणीची तात्काळ दखल.
★ ब्रम्हपुरी रेल्वे स्थानकावर काऊंटर सुरु.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,२८/०९/२०२४ दक्षिण पुर्व मध्य रेल्वेच्या नागपुर विभागातील ब्रम्हपुरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांना आता तात्काळ तिकिटाचीही सुविधा शुक्रवारपासून उपलब्ध झालेली आहे. यापुर्वी या स्थानकावर अनारक्षित व आरक्षित तिकीट मिळत होते.मात्र तात्काळ तिकिट काढण्याची सुविधा नव्हती . तात्काळ तिकिटांसाठी ब्रम्हपुरी सारख्या शैक्षणिक व वैद्यकीय नगरीतील प्रवाशांना नजिकच्या नागभीड किंवा वडसा रेल्वेस्थानकावर जावे लागत होते.
२५ सप्टेंबर ला बिलासपुर येथे झालेल्या दपुम रेल्वे च्या क्षेत्रिय सल्लागार समितीच्या बैठकीत झेडआरयुसीसी सदस्य संजय गजपुरे यांनी ही अडचण महाप्रबंधक श्रीमती नीनु इटारिया यांच्या निदर्शनात आणुन दिली . याची त्वरित दखल घेत त्यांनी निर्देश दिल्यानुसार शुक्रवार दि. २७ सप्टेंबर पासुन ब्रम्हपुरी स्थानकावर तात्काळ तिकिटांची सुविधा काउंटरवर उपलब्ध करण्यात आलेली आहे.
सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत वातानुकुलीत श्रेणी तसेच सकाळी ११ ते १२ वाजेपर्यंत गैरवातानुकुलित तात्काळ तिकिटांची सोय ब्रम्हपुरी रेल्वे स्थानकावर करुन देण्यात आली आहे. माजी आमदार प्रा . अतुल देशकर व भाजपा पदाधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात आणुन दिली होती . ब्रम्हपुरी येथील अनेक प्रवाशांची असलेली मागणी लक्षात घेत दपुम रेल्वे बिलासपुर झोनचे झेडआरयुसीसी सदस्य संजय गजपुरे यांनी या मागणीची पुर्तता केल्याबद्दल त्यांचे व रेल्वे प्रशासनाचे परीसरातुन आभार मानल्या जात आहे.