कोरची येथे कौशल विकास मंत्रालय,भारत सरकार चा उपक्रम जन शिक्षण संस्थान,गडचिरोली च्या वतीने सौन्दर्य प्रशिक्षण व शिवणकला प्रशिक्षणाचे उदघाटन.
एस.के.24 तास
कोरची : कोरची येथे जन शिक्षण संस्थान,गडचिरोली च्या वतीने सौन्दर्य प्रशिक्षण व शिवणकला प्रशिक्षणाचे उदघाटन करण्यात आले.सर्व प्रथम क्रांतिज्योती सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवारांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री.केशव आर.चव्हाण संचालक जन शिक्षण संस्थान, गडचिरोली हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी श्रीमती प्रोमोदींनी काटेगे मॅडम मुख्याध्यापिका जि.प.उच्च प्राथमिक शाळा, कोरची, व कांता साखरे मॅडम सह शिक्षिका उपस्थित होत्या. महिलांना सौन्दर्य प्रशिक्षण चे महत्व व आरोग्य यांची घ्यावायची काळजी व त्यातून रोजगाराची निर्मिती या बाबत प्रमोदींनी मॅडम यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना मा.केशव आर. चव्हाण संचालक यांनी कौशल्य विकास प्रशिक्षण बाबत मार्गदर्शन केले. जनशिक्षण संस्थेचे उद्दिष्ट ग्रामीण भागातील अ-साक्षर, नव-साक्षर तसेच शाळा सोडणाऱ्यांना त्या प्रदेशातील संबंधित बाजारपेठ असलेली कौशल्ये ओळखून व्यावसायिक प्रशिक्षण देणे आहे.भारताच्या लोकसंख्येच्या दोन तृतीयांश पेक्षा जास्त लोकसंख्येमध्ये ग्रामीण नागरिकांचा समावेश आहे.
आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देऊन या ग्रामीण लोकसंख्येला आर्थिकदृष्ट्या उन्नत करणे, त्याद्वारे स्थानिक व्यापार वाढण्यास सक्षम करणे आणि प्रदेशातील मूळ रहिवाशांसाठी नवीन संधी निर्माण करणे हे JSS चे उद्दिष्ट आहे. महिलांना ग्रामीण क्षेत्रातील युवा, युवती व महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याची संधी या प्रशिक्षण मार्फत मिळेल याबाबत मार्गदर्शन केले. आज कोरची तालुक्यात दोन सौन्दर्य प्रशिक्षण केंद्र व एक शिवणकला प्रशिक्षणाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी प्रशिक्षक ममता सुखदेवे सौन्दर्य प्रशिक्षक,कु. रुपाली टेम्भूर्णे - सौन्दर्य प्रशिक्षक व सौ. आशा गुरव शिवणकला प्रशिक्षक, खुशबू सय्यद प्रशिक्षिका उपस्थित होत्या. तसेच प्रमुख उपस्थिती श्रीमती यामिनी मातेरे फिल्ड सहाय्यक उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन ममता सुखदेवे सौन्दर्य प्रशिक्षक यांनी केले. व आभार आशा गुरव यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकारिता सर्व प्रशिक्षिका व प्रशिक्षनार्थी यांनी काम पहिले. कोरची ग्रामीण तालुक्यायत तीन प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
शिवणकला प्रशिक्षण उदघाटन - कोरची प्रशिक्षिका - आशा गुरव
दिनांक 11/09/2024 ला मौजा कोरची येथे जन शिक्षण संस्थान गडचिरोलीच्या वतीने शिवणकला प्रशिक्षण बॅचेस चे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी या कार्यक्रमाचे उदघाटक मा.श्री.केशव आर.चव्हाण संचालक जन शिक्षण संस्थान गडचिरोली हे उपस्थित होते.
तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री.गडपायले सर सहयोग बँक व्यवस्थापक शाखा कोरची,मा. श्री. खोब्रागडे सर,लेखाधिकारी सहयोग बँक शाखा कोरची, मा.श्री.जनबंधू सर,बँक निरीक्षक कोरची उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला,खुशनूमा सय्यद,श्रीमती.यामिनी मातेरे फिल्ड सहाय्यक सौ.आशा गुरव,प्रशिक्षिका उपस्थित होते.
सौन्दर्य प्रशिक्षण केंद्र - 2 प्रशिक्षण उदघाटन - कोराची प्रशिक्षिका - रुपाली टेम्भूर्णे
दिनांक 11/09/2024 ला मौजा कोरची येथे जन शिक्षण संस्थान गडचिरोलीच्या वतीने ब्युटी पार्लर प्रशिक्षण बॅचेस चे उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सुरेखा काटेंगे सामजिक कार्यकर्ते कोरची, श्रीमती मोहूरले मॅडम अंगणवाडी सेविका उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला श्रीमती यामिनी मातेरे, खुशनूमा सय्यद, प्रशिक्षिका सौ. रुपाली तेंभूर्णे उपस्थित होते...